RBI New Rule For Personal Loan: आगामी काळात तुम्हाला वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे थोडे कठीण होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना असुरक्षित कर्ज आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांची पार्श्वभूमी तपासणीचे नियम अधिक कडक करण्यास सांगितले आहे.
खरं तर, असुरक्षित कर्जांमध्ये बँकांकडे कोणतेही तारण नसते आणि अशात कर्ज बुडण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन आरबीआयने बँकांना इशारा दिला आहे.
क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनचा कल वाढला आहे
कोविड नंतर 2022 पासून भारतात क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनचा ट्रेंड खूप वाढला आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये, पर्सनल लोन 7.8 कोटींवरून 9.9 कोटींपर्यंत वाढले, त्यात सुमारे 24% नी वाढ झाली आहे, तर क्रेडिट कार्डवर दिलेले कर्ज 28% ने वाढले - 1.3 लाख कोटींवरून 1.7 लाख कोटी.
या असुरक्षित कर्जाचा वेग 2023 मध्येही थांबलेला नाही. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत, या वर्षी, फेब्रुवारी 2023 पर्यंत, पर्सनल लोन 33 लाख कोटींवरून 40 लाख कोटी म्हणजे 20.4% पर्यंत वाढले आहे.
ग्राहकाची पार्श्वभूमी तपासली जाईल
महागाई आणि वाढलेले व्याजदर यांच्यात देशाच्या मध्यवर्ती बँकेसाठी अशी असुरक्षित कर्जवाढ ही चिंतेची बाब आहे.
त्यामुळेच रिझव्र्ह बँकेने अशा कर्जांमध्ये संभाव्य थकबाकीची शक्यता लक्षात घेऊन बँकांना असुरक्षित कर्जांबाबत कठोर राहण्यास सांगितले असल्याचे BloombergQuint ने वृत्त दिले आहे.
30 डिसेंबर 2022 ते 21 एप्रिल 2023 पर्यंत बँकांवरील क्रेडिट कार्ड कर्ज 1.8 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. लोक क्रेडिट कार्डने अगदी घरभाडे भरू लागले आहेत, जे फसवणुकीचे एक प्रमुख कारण आहे.
यामुळे अनेक बँकांनी क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरणे थांबवण्यासाठी 1-1.5% शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. असुरक्षित कर्जाचे संभाव्य NPA कमी करणे हे उद्दिष्ट. असुरक्षित कर्जे बुडण्याची भीती लक्षात घेता, बँकांना नियम अधिक कडक करावे लागेतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.