RBI MPC Meeting RBI expected to keep rate unchanged know details Sakal
Personal Finance

RBI MPC Meeting: तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार की वाढणार, 4 ऑक्टोबरपासून RBI ची बैठक, 'या' दिवशी होणार निर्णय

RBI MPC Meeting: या आठवड्यात आरबीआयची पतधोरण बैठक होणार आहे.

राहुल शेळके

RBI MPC Meeting: या आठवड्यात आरबीआयची पतधोरण बैठक होणार असून आठवड्याच्या शेवटी व्याजदर वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. अशा स्थितीत व्याजदर कायम राहण्याची शक्यता आहे. आरबीआय महागाई दर आणि कच्च्या तेलावर लक्ष ठेवत आहे.

सध्याचा रेपो दर 6.50 टक्के आहे आणि 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत तो स्थिर ठेवण्याची अपेक्षा आहे. या बैठकीचा निकाल शुक्रवारी (6 ऑक्टोबर) जाहीर होणार आहे.

Economic Times च्या अहवालानुसार RBI MPC रेपो रेट 6.50 टक्के ठेवण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, सलग चौथ्यांदा RBI रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. असे झाल्यास कर्जावरील व्याजदरावर कोणताही परिणाम होणार नाही. रेपो दरात बदल झाल्यावरच बँका कर्जाचे व्याजदर बदलतात.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने मे 2022 मध्ये पॉलिसी रेट वाढवण्यास सुरुवात केली आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांवर पोहोचला. तेव्हापासून, मागील सलग तीन चलनविषयक धोरण बैठकांमध्ये रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे.

DCB बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी सांगितले की, जागतिक कच्च्या तेलाच्या किंमती नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर इक्विटी मार्केटमध्ये विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे. रुपयातही घसरण दिसून आली आहे. अशा स्थितीत दर वाढवले जाऊ शकतात किंवा स्थिर ठेवले जाऊ शकतात.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, या वेळी चलनविषयक धोरणात रेपो दर 6.5% वर कायम ठेवला जाईल. ते म्हणाले की किरकोळ महागाई अजूनही 6.8% च्या उच्च पातळीवर आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये त्यात घट होण्याची अपेक्षा आहे, परंतु खरिप उत्पादनाबाबत काही शंका आहेत ज्यामुळे किंमती वाढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT