RBI MPC New Member: Sakal
Personal Finance

RBI MPC New Member: तुमचा EMI ठरवणाऱ्या RBIच्या समितीतील तीन नवे चेहरे कोण? व्याजदर कमी होणार का?

RBI MPC New Member: सरकारने मंगळवारी राम सिंग, सौगता भट्टाचार्य आणि नागेश कुमार यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीचे (MPC) नवीन बाह्य सदस्य म्हणून नियुक्ती केली.

राहुल शेळके

RBI MPC New Member: सरकारने मंगळवारी राम सिंग, सौगता भट्टाचार्य आणि नागेश कुमार यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीचे (MPC) नवीन बाह्य सदस्य म्हणून नियुक्ती केली. ते मुंबईच्या प्राध्यापक आशिमा गोयल, आयआयएम-अहमदाबादचे प्राध्यापक जयंत वर्मा आणि वरिष्ठ सल्लागार शशांक भिडे यांची जागा घेतील.

त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबरला संपत आहे. या नियुक्त्या अशा वेळी झाल्या आहेत जेव्हा जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमध्ये बदल होताना दिसत आहेत. नवीन सदस्यांवर व्याजदर कमी करण्याचा दबाव असेल.

नवीन सदस्यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. राम सिंग हे दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आहेत. तर, डॉ. नागेश कुमार हे नवी दिल्ली स्थित इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे संचालक आणि मुख्य कार्यकारी आहेत. सौगता भट्टाचार्य हे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत.

RBI MPC New Member

यूएस फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरमध्ये 2020 नंतर प्रथमच आपल्या प्रमुख व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली. यामुळे जगभरातील इतर केंद्रीय बँकांना बाजारातील गोंधळ टाळण्यासाठी पावले उचलण्यास भाग पाडले आहे.

नेतृत्वातील बदलाचा कसा परिणाम होऊ शकतो?

RBI च्या नेतृत्वातील बदलामुळे आर्थिक धोरणात मोठे बदल होऊ शकतात. जून 2017 मध्ये महागाई 1.46% च्या विक्रमी नीचांकी पातळीवर गेली असतानाही उर्जित पटेल यांनी व्याजदरात कपात करण्याच्या मागण्या नाकारल्या होत्या. फेब्रुवारी 2019 मध्ये, दास यांनी त्यांच्या पहिल्या MPC बैठकीत अचानक दरात कपात केली होती.

दास यांच्यावर आता व्याजदर कपातीचा दबाव आहे. त्याचे कारण म्हणजे जागतिक मध्यवर्ती बँका त्यांची धोरणे बदलत आहेत. अर्थव्यवस्था मंदावण्याची चिन्हे आहेत. दास यांनी वारंवार सांगितले आहे की, ते सध्या कपातीचा विचार करत नाहीत. त्यांना महागाई दर 4% च्या लक्ष्यापर्यंत खाली आणायचा आहे.

एमपीसीमध्ये कोण आहेत?

MPC चे अध्यक्ष RBI गव्हर्नर असतात. त्यात सहा सदस्यांचा समावेश आहे. RBI चे तीन प्रतिनिधी आहेत. यामध्ये गव्हर्नर यांचाही समावेश आहे. तर इतर तीन बाह्य सदस्य आहेत.

निवड कशी केली जाते?

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास, कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन आणि आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बाह्य MPC सदस्यांची निवड करते. या पदांना अंतिम मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून दिली जाते.

बाह्य सदस्य कोणत्या पार्श्वभूमीचे असतात?

बाह्य सदस्य हे सहसा शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ किंवा वित्त आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समधील तज्ञ असतात. त्यांची नियुक्ती चार वर्षांच्या कार्यकाळासाठी केली जाते. आरबीआयच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वेळेपूर्वी केल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT