RBI Penalty on IDFC First Bank: केंद्रीय बँकेच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने IDFC फर्स्ट बँक आणि एलआयसी हाउसिंग फायनान्सवर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने आयडीएफसी फर्स्ट बँकेला 1 कोटी रुपये आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्सला 49.70 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने शुक्रवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली. कर्जाशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड IDFC फर्स्ट बँकेवर लावण्यात आला आहे, असे RBI ने म्हटले आहे.
'नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी - हाऊसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) मार्गदर्शक तत्त्वे, 2021' च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल LIC हाउसिंग फायनान्सवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI penalises IDFC First Bank, LIC Housing Finance for non-compliance)
मात्र, या दंडाचा कोणताही परिणाम या बँकांच्या ग्राहकांवर होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान RBI ने 4 NBFC चे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.
ज्यात उत्तर प्रदेशचे कुंडलेस मोटर फायनान्स, तामिळनाडूचे निथ्या फायनान्स, पंजाबचे भाटिया हायर पर्चेस आणि हिमाचल प्रदेशचे जीवनज्योती डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेस यांचा समावेश आहे. सेंट्रल बँकेच्या या कारवाईनंतर आता या चार NBFC यापुढे व्यवसाय करू शकणार नाहीत.
या दोन्ही कंपन्यांना आरबीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईचा (RBI Penalises LIC Housing Finance, IDFC First Bank Over Violation)
एका वेगळ्या अधिसूचनेत, RBI ने म्हटले आहे की 5 NBFCs- ग्रोइंग अपॉर्च्युनिटी फायनान्स इंडिया, इन्व्हेल कमर्शियल, मोहन फायनान्स, सरस्वती प्रॉपर्टीज आणि क्विकर मार्केटिंग यांनी व्यवसायातून बाहेर पडल्यामुळे त्यांचे परवाने परत केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.