RBI Web Series: देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या 90 वर्षांच्या प्रवासावर पाच भागांची वेब सिरीज सुरू करण्याची योजना आखत आहे. वेब सिरीजचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. एका भागाचा कालावधी 25-30 मिनिटांचा असेल. ही वेब सिरीज टीव्ही चॅनल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली आणि या वर्षी एप्रिलमध्ये बँकेला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही पाच भागांची मालिका अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती बँकेच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांची समज वाढवण्यासाठी, अधिक सहभाग वाढवण्यासाठी आणि धोरणांवर विश्वास निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे.
वेब सीरिजसाठी, RBI ने इच्छुक प्रोडक्शन हाऊस, टीव्ही चॅनेल आणि OTT प्लॅटफॉर्म कडून प्रस्ताव मागवले आहेत. या वेब सिरीजचे पहिले उद्दिष्ट एक सर्वसमावेशक आणि आकर्षक वेब सीरिज तयार करणे आहे.
आरबीआयने सांगितले की, या वेब सिरीजचा उद्देश कठीण आर्थिक संकल्पना प्रेक्षकांसाठी सुलभ आणि मनोरंजक बनवणे, ज्यामुळे आर्थिक साक्षरतेला हातभार लागेल. ही वेब सिरीज मध्यवर्ती बँकेसाठी माहितीचे आणि संवादाचे साधन म्हणूनही काम करेल.
देशाची आर्थिक स्थिरता राखण्यासाठी भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींनंतर 1 एप्रिल 1934 रोजी RBI ची स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 1935 रोजी सर ऑस्बोर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते.
गेल्या काही वर्षांत, RBI ने 26 गव्हर्नर पाहिले आहेत, सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास आहेत, ज्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये पदभार स्वीकारला. आरबीआयचे केंद्रीय कार्यालय सुरुवातीला कोलकाता येथे होते परंतु ते 1937 मध्ये मुंबईत हलविण्यात आले.
RBI आपला 90 वा वर्धापन दिन साजरा करत असताना, देशाची आर्थिक स्थिरता राखण्यात, आर्थिक क्षेत्राचे नियमन करण्यात आणि पेमेंट इकोसिस्टममध्ये डिजिटल क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.