RBI Rule Sakal
Personal Finance

RBI Rule: खबरदार जर तुम्ही कर्जदारांना सकाळी आठ अन्... RBIने एजंटला दिली ताकीद

RBI Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

राहुल शेळके

RBI Rule: कर्जवसुलीसाठी बँका अनेकदा ग्राहकांना त्रास देतात. वारंवार फोन करून धमक्या देतात. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर घाबरण्याची गरज नाही. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आता बँकेचे एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी संध्याकाळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच एजंटला कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी असेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठी कडक नियम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या अंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजंट कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाहीत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, वित्तीय संस्थांनी कोणतेही काम आऊटसोर्सिंग केल्यानंतरही त्यांची जबाबदारी संपत नाही. ग्राहकांप्रती त्या संस्था तितक्याच जबाबदार आहेत. यासोबतच या मसुद्यात RBI ने डायरेक्ट सेल्स एजंट, डायरेक्ट मार्केटिंग एजंट आणि रिकव्हरी एजंटसाठी नियम बनवण्याबाबत सांगितले आहे.

हा नियम सार्वजनिक, खाजगी आणि NBFC या तिन्हींसाठी लागू आहे. यासोबतच कर्ज वसूल करताना रिकव्हरी एजंटना कॉल किंवा मेसेजवर ग्राहकांशी कधी आणि कसा संवाद साधायचा याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असे आरबीआयने म्हटले आहे.

यासोबतचं रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि बँकांना केवायसी नियम, कर्ज मंजूरी इत्यादीसारख्या महत्त्वाच्या धोरण व्यवस्थापन कार्यांचे आउटसोर्सिंग टाळण्याचा सल्ला दिला आहे.

कर्ज वसुलीचा नियम काय आहे?

जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेता आणि तेव्हा तुम्ही 2 EMI न भरल्यास, बँक तुम्हाला प्रथम रिमाइंडर पाठवते. परंतु जर तुम्ही तिसरा हप्ता भरला नाही, तर बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवेल आणि चेतावणी देईल की तुम्ही पेमेंट न केल्यास, बँकेद्वारे तुम्हाला डिफॉल्टर घोषित केले जाईल. त्या वेळी, नोटीस दिल्यानंतर, बँक रिकव्हरी एजंटद्वारे ग्राहकांकडून कर्जाची वसुली सुरू करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

IND A vs AFG A : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना बदड बदड बदडले... ट्वेंटी-२०त दोनशेपार पोहोचले

IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला

MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

Latest Maharashtra News Updates Live : पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार- सुधीर साळवी

SCROLL FOR NEXT