RBI says 97.26 percent of Rs 2000 notes back in the system Rs 2,000 banknotes continue to be legal tender  Sakal
Personal Finance

RS 2000 Note: दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकांमध्ये आल्या परत

RS 2000 Note Latest Update: RBI ने 19 मे 2023 रोजी 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

राहुल शेळके

RS 2000 Note Latest Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सांगितले की चलनातून काढून टाकलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण 97.26% नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. RBI ने 19 मे 2023 रोजी 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. आरबीआयचे म्हणणे आहे की 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा राहतील.

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय नोटाबंदीशी जोडला गेला आणि त्याला मिनी नोटाबंदी असेही म्हटले गेले. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. 30 नोव्हेंबर 2023 चलनात राहिलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 9,760 कोटी रुपये आहे.

आरबीआयच्या नियमानुसार सुरुवातीला बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 होती, जी नंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर लोकांना आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलून देण्यास सांगण्यात आले. मात्र असे असतानाही या नोटा मोठ्या प्रमाणात परत आलेल्या नाहीत.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की 2000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील. मात्र, ते परत करण्यासाठी लोकांना रिझर्व्ह बँकेच्या प्रदेश कार्यालयात जावे लागणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ते म्हणाले होते, 'मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो की, आता ज्या 2,000 रुपयांच्या नोटा बंद केल्या जात आहेत, त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT