RBI On Paytm: रिझर्व्ह बँकेने पेटीएम कंपनीवर केलेल्या कारवाईनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहीती दिली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पेटीएम सारख्या संस्थांना नियमांचे पालन करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.
तरीही नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई करावी लागली. दास म्हणाले की, जर एखादी संस्था नियमांचे पालन करत असेल तर आम्ही कारवाई का करु नये? आम्ही एक जबाबदार संस्था आहोत.
सर्व पेमेंट बँकांनी घाबरण्याची गरज नाही
गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पेटीएम विरोधात केलेल्या कारवाईमुळे फिनटेक बँकांना घाबरण्याची गरज नाही कारण ही कारवाई एका कंपनीशी संबंधित आहे. सर्वांना पुरेसा वेळ दिला जातो असेही ते म्हणाले.
नियम पाळले असते तर कारवाई का झाली असती? पेटीएम संकटाबाबत, आरबीई गव्हर्नर म्हणाले की FAQ (frequently asked question) लवकरच जाहीर केले जातील.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. कारण कारवाईनंतर पेटीएमचे शेअर्स घसरले आहेत. या संकटात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
वित्तीय संस्थांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतो: गव्हर्नर शक्तीकांत दास
एमपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, मी सर्वांना आश्वासन देतो की भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत आहे. बँका आणि NBFC ची कामगिरी आणि आकडेवारी चांगली आहे. वित्तीय संस्थांच्या विकास दरात तेजी आहे. आम्ही एक नियामक संस्था म्हणून आमचे काम करतो.
आम्ही वित्तीय संस्थांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. कुठे उणिवा आहेत, कुठे मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेली नाहीत हे आम्ही त्यांना सांगतो. आम्ही त्यांना उणिवा सुधारण्यासाठी वेळ देतो. जेव्हा वेळेवर सुधारणा होत नाही, त्यावेळी सर्वसामान्य जनतेचे हित, ग्राहक व ठेवीदारांचे हित आणि वित्तीय संस्थांचे हित लक्षात घेऊन कारवाई करावी लागते.
पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा घसरण
पेटीएम पेमेंट बँकेवर केलेल्या कारवाईवर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या वक्तव्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीनंतर लोअर सर्किटवर आले आहेत. दिवसभरातील 528 रुपयांच्या उच्चांकावरून हा शेअर 15.40 टक्क्यांनी घसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.