Drop in RBI Gold Reserve Sakal
Personal Finance

Gold Reserve: परकीय सोन्याचा साठा 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; रिझर्व्ह बँक भारतात सोने का आणत आहे?

Drop in RBI Gold Reserve: आरबीआय परदेशात ठेवलेले सोने भारतात आणत आहे. याचा परिणाम म्हणजे मार्चअखेरीस परदेशात रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Drop in RBI Gold Reserve: आरबीआय परदेशात ठेवलेले सोने भारतात आणत आहे. याचा परिणाम म्हणजे मार्च अखेरीस परदेशात रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा सहा वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आणि याच कारणास्तव RBI ने परदेशात ठेवलेले 47 टक्के सोने भारतात परत आणले आहे. आणि आता केवळ 53 टक्के सोने विदेशात ठेवले आहे. मार्च 2024 पर्यंत, आरबीआयकडे एकूण 822.1 टन सोने होते.

अमेरिकेच्या भूमिकेमुळे आरबीआय सतर्क

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकन सरकारने रशियन विदेशी चलन मालमत्ता गोठवल्यानंतर जगभरातील बँकिंग नियामक सतर्क झाले आहेत.

गेल्या महिन्याच्या अखेरीस, RBI ने UK मधून 100 टन सोने भारतात परत आणले आहे. यावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, देशांतर्गत साठवण क्षमता पुरेशी असल्याने यापेक्षा जास्त कशाचाही विचार करू नये.

मात्र, बाजारातील तज्ज्ञ आरबीआय गव्हर्नर यांचे म्हणणे पूर्ण सत्य मानत नाहीत. विश्लेषक आरबीआयच्या या बदललेल्या रणनीतीचा संबंध रशिया-युक्रेन युद्धाशी जोडत आहेत. खरे तर रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यासारखी पावले उचलली.

यासोबतच अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी रशियाची विदेशी संपत्ती जप्त केली. रिझर्व्ह  बँकेला अशा कोणत्याही परिस्थितीसाठी तयारी करायची आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत भारताच्या मालमत्तेवर इतर कोणत्याही देशाचे नियंत्रण राहू नये.

दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये जगभरातील 57 मध्यवर्ती बँका आणि इतर मालमत्ता व्यवस्थापकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की त्यांनी 8-10 वर्षांपूर्वी सोन्याचे एक्सपोजर वाढवले, ते लंडनमध्ये ठेवले आणि स्वॅपद्वारे परताव्यासाठी वापरले. परंतु आता ते त्यांचे रिझर्व्ह त्यांच्या देशात परत घेऊन जात आहेत.

सर्वेक्षणानुसार, केंद्रीय बँकांकडे 2020 मध्ये त्यांच्या देशात 50 टक्के सोन्याचा साठा होता. पुढील पाच वर्षांत त्यात 74 टक्के वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच सर्व केंद्रीय बँका त्यांच्या देशात सोने परत आणत आहेत.

ज्या पद्धतीने RBI ने गेल्या काही महिन्यांत आपले सोने भारतात परत आणण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात त्याला कोणताही धोका पत्करायचा नाही हे यावरून स्पष्ट होते. सप्टेंबर 2021 मध्ये भारतात फक्त 39 टक्के सोने होते, जे मार्च 2024 मध्ये वाढून 53 टक्के झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT