Reliance Industries is India's most valuable firm  Sakal
Personal Finance

Hurun India: देशातील टॉप 500 खासगी कंपन्यांचे मूल्यांकन सौदी अरेबियाच्या GDPपेक्षा जास्त, रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर

Hurun India: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पुन्हा एकदा देशातील सर्वोच्च कंपनीचा मान मिळवला आहे. बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज सलग तिसऱ्या वर्षी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.

राहुल शेळके

Hurun India: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पुन्हा एकदा देशातील सर्वोच्च कंपनीचा मान मिळवला आहे. ॲक्सिस बँकेच्या खाजगी बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज सलग तिसऱ्या वर्षी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि HDFC बँक या यादीत आहेत. (Reliance Industries is India's most valuable firm)

बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया 500च्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 15.6 लाख कोटी रुपये आहे, तर TCS आणि HDFC चे बाजार भांडवल अनुक्रमे 12.4 लाख कोटी आणि 11.3 कोटी रुपये आहे.

अहवालात म्हटले आहे की, 'HDFC आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणानंतर ही बँक 10 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी तिसरी कंपनी बनली आहे.' (Reliance Industries tops the list of India's most valuable companies in Burgundy Private and Hurun India)

अहवालानुसार, उदयोन्मुख कंपन्यांमध्ये सुझलॉन एनर्जीची सर्वात वेगवान वाढ झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, 'सुझलॉन एनर्जी 436 टक्क्यांनी वाढली आहे आणि 2023 मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. यानंतर जिंदाल स्टेनलेस आणि जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश होता.

यावेळी एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि कोटक महिंद्रा बँक देखील पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत परतल्या आहेत. याशिवाय जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने रिलायन्स इंडस्ट्रीजसह डिमर्जरनंतर 28 वा क्रमांक मिळवला आहे.

कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले

वर्ष 2023 साठी यादीत समाविष्ट कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून 231 लाख कोटी रुपये झाले, तर 2022ला हा आकडा 226 लाख कोटी रुपये होता. अहवालानुसार, 'या यादीत समाविष्ट कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा (जीडीपी) जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT