Mukesh Ambani  Sakal
Personal Finance

Mukesh Ambani: मुकेश अंबानी परदेशी बँकांकडून घेणार 1.5 बिलियन डॉलर कर्ज, काय आहे कारण?

कंपनी सुमारे 1-1.5 अब्ज डॉलर कर्ज उभारणार आहे.

राहुल शेळके

Reliance Jio 5G Network: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जिओसाठी परदेशी बँकांशी संपर्क साधला आहे. रिलायन्स जिओ हा निधी 5G नेटवर्कसाठी वापरणार आहे.

रिलायन्स जिओने या वर्षाच्या सुरुवातीला 5G नेटवर्कवर ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. असे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने कर्ज घेण्यासाठी जागतिक बँकांशी संपर्क साधला आहे. कंपनी सुमारे 1-1.5 अब्ज डॉलर कर्ज उभारणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हे कर्ज 5G नेटवर्क खरेदी करण्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी वापरले जाईल.

जेपी मॉर्गन चेस, सिटी, एचएसबीसी सारख्या जागतिक कर्जदाते जिओसाठी सुमारे 3-5 वर्षांसाठी कर्जाची व्यवस्था करण्यास तयार आहेत. कर्जाची किंमत SOFR पेक्षा जवळपास 100 ते 150 पट जास्त असू शकते.

5G बाबत जिओचा प्लॅन काय आहे?

अंबानींच्या जिओने गेल्या ऑक्टोबरपासून 5G कव्हरेजचा झपाट्याने विस्तार केला आहे. दूरसंचार ऑपरेटरने आधीच देशातील सुमारे 5,700 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.

जिओचे म्हणणे आहे की ते 25 अब्ज डॉलरची एकत्रित 5G मध्ये गुंतवणूक करेल, ज्यामध्ये 5G स्पेक्ट्रमचे 11 अब्ज डॉलरच्या खर्चाचा समावेश आहे.

Jio एरिक्‍सन आणि सोबत काम करत आहे

कंपनी Jio 5G साठी युरोपियन नेटवर्क विक्रेते एरिक्‍सन आणि नोकिया सोबत काम करत आहे. दूरसंचार ऑपरेटरने नोकियाकडून उपकरणे खरेदी करण्यासाठी 1.6 अब्ज डॉलर उभारण्याची तयारीही दर्शवली आहे.

नोकियाने गेल्या ऑक्टोबरमध्ये घोषित केले होते की त्यांनी भारतात 5G रोलआउटसाठी Jio ला उपकरणे पुरवण्यासाठी करार केला आहे.

रिलायन्स जिओने एअरवेव्ह मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यासह अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतात 5G ऑफर करणारी पहिली कंपनी बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT