Reliance Retail to acquire Arvind Fashions arm  Sakal
Personal Finance

Reliance Retail: मुकेश अंबानींनी गुजरातमधील आणखी एक कंपनी घेतली विकत; 'इतक्या' कोटींना झाली डील

राहुल शेळके

Reliance Retail Sephora Deal: आणखी एक फॅशन कंपनी अंबानींच्या पोर्टफोलिओमध्ये सामील होणार आहे. अहमदाबादस्थित लालभाई कुटुंबाची कंपनी असलेल्या अरविंद फॅशनने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

प्रसिद्ध सौंदर्य उत्पादन किरकोळ विक्रेता सेफोराने रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडसोबत भागीदारी जाहीर केली आहे. ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

ही भागीदारी RRVL ला भारतातील सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर सेफोरा उत्पादने विकण्याचे अधिकार देईल. सेफोरा 2012 पासून भारतात आपली उत्पादने विकत आहे.

रिलायन्स सेफोराची 26 स्टोअर्स विकत घेणार

रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेड भारतातील 13 शहरांमध्ये 26 सेफोरा स्टोअर्स विकत घेणार आहे. भारतीय सौंदर्य बाजार 17 अब्ज डॉलरचा आहे आणि 11% च्या CAGR ने वाढत आहे.

99 कोटी रुपयांत करार पूर्ण होणार

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या डीलची रक्कमही कंपनीने फाइलिंगमध्ये उघड केली आहे. अरविंद फॅशनच्या मते, कंपनीच्या सौंदर्य उत्पादने विभागातील संपूर्ण इक्विटी स्टेक मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलद्वारे 99.02 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले जातील. अरविंद ब्युटी ब्रँड्स रिटेलची आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उलाढाल 336.70 कोटी रुपये होती.

खरेदीच्या बातमीने शेअर्समध्ये तेजी

बाजारातील तेजीच्या दरम्यान आलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबतच्या या कराराचा परिणाम अरविंद फॅशनच्या शेअर्सवरही दिसून आला. कंपनीचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, अरविंद फॅशन शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 362.20 रुपयांवर पोहोचले.

ईशा अंबानीच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेलचा व्यवसाय

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या रिलायन्स रिटेलच्या संचालक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे.

अरविंद फॅशनशी नुकत्याच झालेल्या करारापूर्वी, रिलायन्स रिटेलने अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या अॅड-ए-मम्मा कंपनीमध्ये 51 टक्के भागभांडवल विकत घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT