Report of SNB sakal
Personal Finance

Report of SNB : स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींत घसरण;‘एसएनबी’च्या अहवालातील निरीक्षण,चार वर्षांतील नीचांकी गुंतवणूक

भारतीय व्यक्ती आणि संस्थांनी स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांसह स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या निधीत ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. भारतीय गुंतवणूक २०२३ मध्ये १.०४ अब्ज स्विस फ्रँक(९,७७१ कोटी रुपये) एवढी कमी झाली आहे. या चार वर्षांचा हा नीचांक आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय व्यक्ती आणि संस्थांनी स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांसह स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या निधीत ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. भारतीय गुंतवणूक २०२३ मध्ये १.०४ अब्ज स्विस फ्रँक(९,७७१ कोटी रुपये) एवढी कमी झाली आहे. या चार वर्षांचा हा नीचांक आहे.

स्वित्झर्लंडच्या ‘स्विस नॅशनल बँक’ (एसएनबी) या मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक आकडेवारीवरून हे निरीक्षण नोंदविले आहे. बँकेचा वार्षिक अहवाल गुरुवारी (ता.२०) जाहीर झाला. स्विस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या गुंतवणुकीत गेल्या दोन वर्षांपासून घट होत आहे. २१ व्या शतकातील तिसऱ्या दशकातील पहिल्या वर्षांत म्हणजे २०२१ मध्ये स्विस बँकेतील गुंतवणूक आकाशाला भिडली होती.

गेल्या १४ वर्षांतील हा उच्चांक होता. त्यावर्षी ही गुंतवणूक ३.८३ अब्ज स्विस फ्रँक होती. त्यानंतर भारतीयांची गुंतवणुकीची घसरण सुरू झाली आणि २०२३च्या आकडेवारीनुसार गुंतवणूक चार वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. प्रामुख्याने रोखे, सिक्युरीटीज आणि अन्य आर्थिक घटकांमधील गुंतवणूक कमी झाल्याचे दिसत आहे. इतर आर्थिक पर्यायांमध्ये ठेवलेले पैशांमध्ये घट झाल्याने आणि रोख्यांच्या किमती कमी झाल्याने गुंतवणूक कमी झाल्याचे सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे भारतातील इतर बँक शाखांमधील ग्राहकांच्या ठेव खात्यातील रक्कम आणि निधीमध्येही लक्षणीय घट झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. बँकांनी ‘एसएनबी’ला दिलेली ही अधिकृत माहिती आहे. स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या काळा पैशाचा यात उल्लेख केलेला नाही.तसेच भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी तिसऱ्या देशातील (युरोपीय समुदायाची मान्यता नसलेले देश) अस्तित्व दाखवून ठेवलेले पैसेही कमी झाले आहेत.२००६ मध्ये ६.५ अब्ज स्विस फ्रँक एवढी उच्चांकी गुंतवणूक झाली होती. त्यानंतर २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ सह काही वर्षे वगळता या आकडेवारीत घट झाली.

स्विस बँकेची चर्चा

  • स्वित्झर्लंडमध्ये १७१३ मध्ये पहिल्या बँकेची स्थापना

  • सध्या ४०० पेक्षा जास्त बँका कार्यरत

  • गोपनीयतेच्या कलमानुसार खाते सुरू करण्याचा अधिकार

  • सर्वसामान्यपणे ज्याला स्विस बँक म्हणले जाते ती ‘यूएसबी’ आहे

  • युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड आणि स्विस बँक कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणानंतर ‘यूएसबी’.

२०२३ २०२२

स्विस बँकांचे ‘एकूण दायित्व’ किंवा भारतीय ग्राहकांना ‘देय रक्कम’ १०३.९८ ----

ग्राहक ठेवी ३१ ३९.४

अन्य बँकामार्फत ४२.७ १११

विश्‍वस्तांमार्फत ०१ २.४

रोखे, सिक्युरिटीज, अन्य पर्यायांमार्फत ३०.२ १८९.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT