RK Arora Sakal
Personal Finance

RK Arora: 34 कंपन्या अन् करोडोंची संपत्ती! एक चुक अन् अब्जाधीश आरके अरोरा आले जमिनीवर, काय आहे प्रकरण?

रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोरा यांना दिल्ली न्यायालयाने 10 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

राहुल शेळके

Rise And Fall Of Supertech: रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोरा यांना दिल्ली न्यायालयाने 10 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर 1,500 कोटी रुपयांच्या बँकेच्या कर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ईडीने मंगळवारी त्यांना अटक केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरोरा यांना अटक करण्यात आली आहे.

फ्लॅटच्या नावावर सुपरटेकने खरेदीदारांकडून भरपूर पैसे वसूल केले, मात्र फ्लॅट दिले नाहीत, असे ईडीला तपासात आढळून आले. यासोबतच अरोरा यांनी अॅडव्हान्स घेतलेली रक्कम आणि बँकांच्या कर्जात मिळालेल्या पैशांचाही गैरवापर केला आहे.

1995 मध्ये सुपरटेक लिमिटेड सुरू करणारे आरके अरोरा जितक्या वेगाने घसरत आहेत तितक्याच वेगाने त्यांनी यश मिळवले आहे.

7 डिसेंबर 1995 रोजी आरके अरोरा यांनी त्यांच्या काही मित्रांसह सुपरटेकचा पाया रचला. रिअल इस्टेटशिवाय त्यांनी सिव्हिल एव्हिएशन, कन्सल्टन्सी, ब्रोकिंग, फिल्म्स, हाऊसिंग फायनान्स, कन्स्ट्रक्शन या व्यवसायात उतरले.

एका वर्षात 19 कंपन्या स्थापन

आरके अरोरा यांनी आपला व्यवसाय वाढवण्यास किती तत्परता दाखवली, याचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, 2016 मध्ये त्यांनी 19 कंपन्यांची नोंदणी केली. आरके अरोरा यांच्याकडे एकूण 34 कंपन्या आहेत.

1999 मध्ये आरके अरोरा यांनी त्यांची पत्नी संगीता अरोरा यांच्या नावावर सुपरटेक बिल्डर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. काही वेळातच सुपरटेकने रिअल इस्टेट क्षेत्रात धुमाकूळ घातला.

कंपनीने दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आहेत आणि खरेदीदारांना वेळेवर फ्लॅट हस्तांतरित केले. सुपरटेक हिल इस्टेट, सुपरटेक सफारी स्टुडिओ, सुपरटेक हाइट्स, सुपरटेक रेनेसान्स, सुपरटेक द रोमानो, सुपरटेक इको व्हिलेज यांसारख्या प्रकल्प उभे केले. पण, एकाच वेळी अनेक क्षेत्रांत पाय पसरवण्याच्या सुपरटेकच्या प्रयत्नामुळे त्यांचा रिअल इस्टेट व्यवसाय अडचणीत आला.

दिवाळखोर कंपनी

सुपरटेकला अनेक दिवसांपासून समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु, 2022 पर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. सुपरटेकच्या रिअल इस्टेट कंपनीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने मार्च 2022 मध्ये बँकांना 400 कोटींहून अधिक कर्ज न दिल्याबद्दल दिवाळखोर घोषित केले होते.

सुपरटेक समूहावर बँकांचे मोठे कर्ज आहे. त्यांचे किमान 18 प्रकल्प निधीअभावी पूर्ण झालेले नाहीत. यासोबतच कंपनीने घर खरेदी करणाऱ्यांकडून करोडो रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले आहेत.

सुमारे 20 हजार लोक सुपरटेककडून फ्लॅट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता कंपनीच्या चेअरमनवर कायदेशीर कारवाई केल्यावर सुपरटेक समूहाच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT