Female Leaders: मॅनेजर पदावर असलेल्या महिलांच्या संख्येच्या आकडेवारीने देशाची चिंता वाढवली आहे. पॅरिस-आधारित ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या (OECD) ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की पुरुषांच्या तुलनेत देशातील मॅनेजर पदावर असलेल्या महिलांची संख्या 20% पेक्षा कमी आहे.
कोविड नंतर परिस्थिती बिकट झाली आहे. 2019 मध्ये मॅनेजर पदावर महिलांचा वाटा 16.9% होता, जो 2022 मध्ये कमी होऊन 15.9% झाला आहे.
(Women's representation in Indian companies)
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात असे दिसून आले आहे की महिलांच्या सहभागा बाबतीत आघाडीच्या देशांमध्ये भारताची स्थिती अत्यंत वाईट आहे. जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी फक्त जपानची स्थिती भारतापेक्षा वाईट आहे.
(female ratio in leading position in indian companies)
मॅनेजर पदावर महिलांचा सहभाग
मॅनेजर पदावर भारतीय महिलांचा वाटा चांगला नाही. कंपनी कायदा 2013 नुसार किमान एक महिला संचालक असणे आवश्यक आहे. 2022 मध्ये देशातील कंपन्यांमध्ये 18.2% महिला संचालक होत्या. 2019 मध्ये हा आकडा 15.9% होता.
भारतीय महिला कमाईच्या बाबतीतही मागे आहेत. जगभरातील महिला पुरुषांपेक्षा कमी कमावतात पण भारतात ही आकडेवारी अधिक दयनीय आहे. उदारणार्थ भारतात, जर एखाद्या पुरुषाने 100 रुपये कमावले तर महिला फक्त 22.8 रुपये कमावतात.
जर्मनी आणि जपानमध्ये महिला 57.2 रुपये कमवतात, ब्राझीलमध्ये 62.8 रुपये आणि चीनमध्ये 64.4 रुपये कमावतात. हे सर्व आकडे 100 रुपये कमावणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत आहेत. या तुलनात्मक आधारावर, महिला अमेरिकेत 67.5 रुपये आणि दक्षिण आफ्रिकेत 71.4 रुपये कमावतात.
लैंगिक समानतेमध्ये भारताचा जगात 127 व्या क्रमांकावर आहे. कुवेत, म्यानमार, जपान आणि झांबियासारखे आफ्रिकन देशही भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार 2020 मध्ये भारताची स्थिती सुधारली होती आणि भारताने 8 स्थानांनी झेप घेतली होती.
महिलांच्या शैक्षणिक स्थितीच्या बाबतीत भारताचा जगात 26वा क्रमांक लागतो. ही निश्चितच समाधानाची बाब आहे आणि ही परिस्थिती भारतीय महिलांसाठीही आशा निर्माण करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.