2000 Rupee Note esakal
Personal Finance

2000ची नोट बाद झाली? की वितरणातून मागे घेतली? RBIनं नेमकं काय म्हटलंय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांची नोट चलनातून तात्काळ प्रभावानं मागं घेतल्याची घोषणा केली आहे. पण यावरुन नागरिकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. 2000 ची नोट बंद झालीए की तिचा वापर सुरुच राहणार आहे? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊयात आरबीआयनं आपल्या निवदेनात नेमकं काय म्हटलं आहे. (Rs 2000 note is ban Or withdrawn from circulation What exactly has RBI said)

आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं की, 2000 रुपये मुल्य असलेल्या बँकनोट या वितरणातून मागे घेण्यात आल्या आहेत. पण त्या वैध चलन म्हणून कायम असणार आहे. याचाच अर्थ असा की 2000 रुपये किंमतीची नोट ही आता व्यवहारात दिसणार नाहीत, पण ही नोट बाद ठरवलेली नाही.

सन 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीसारखा निर्णय नाही

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता राष्ट्रीय टेलिव्हजन येऊन अचानक नोटाबंदीची घोषणा केली होती. म्हणजेच मोदींच्या घोषणेनंतर रात्री बारानंतर ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या होत्या. म्हणजेच त्या केवळ कागदाच्या कपटा बनून राहिल्या होत्या. कारण या दोन्ही किंमतीच्या नोटा वैध मुल्य म्हणून बाद ठरल्या होत्या.

पण आरबीआयच्या आजच्या निर्णयानुसार, २३ मे २०२३ पासून लोक आपल्याजवळील 2000 रुपयांच्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करु शकतात तसेच त्या इतर किंमतीच्या नोटांच्या स्वरुपात बदलूनही घेऊ शकतात. अर्थात 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळतील पण त्या बाद ठरणार नाहीत.

2000 ची नोट मागे घेण्याचा निर्णय का घेतला?

१) 2000ची नोट मागे घेण्यामागं आरबीआयनं 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. ही पॉलिसी काळ्या पैशाच्या संदर्भात असून असा पैसा नष्ट व्हावा हा एक यामागचा उद्देश आहे.

२) त्याचबरोबर सध्या वितरणात ज्या 2000 रुपयांच्या ८९ टक्के नोटा आहेत त्या सन २०१७ मध्ये चलनात आणल्या गेल्या होत्या. या नोटांचं जीवन अर्थात लाईफ ४ ते ५ वर्षे असते, नोटांची ही लाईफही संपली होती. त्यामुळेच त्या नोटा खराबही झालेल्या होत्या.

३) तसेच 2000 रुपयांच्या फेक नोटाही चलनात मोठ्या प्रमाणावर आल्या असल्यानं ही नोटचं चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्र सरकारच्या सुत्रांनी दिल्याचं इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT