shaktikanta das 
Personal Finance

2000 Rs Note: 12 जानेवारीपासून मुंबईच्या RBI कार्यालयातून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत

Rupees 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 11 जानेवारी रोजी सांगितले की ऑपरेशनल कारणांमुळे 12 जानेवारी 2024 रोजी लोक आरबीआयच्या मुंबईतील स्थानिक कार्यालयात 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत. RBI ने सांगितले की ही सेवा सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी पुन्हा सुरू होईल.

राहुल शेळके

Rupees 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 11 जानेवारी रोजी सांगितले की ऑपरेशनल कारणांमुळे 12 जानेवारी 2024 रोजी लोक आरबीआयच्या मुंबईतील स्थानिक कार्यालयात 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत. RBI ने सांगितले की ही सेवा सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी पुन्हा सुरू होईल.

आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. बहुतांश लोकांना प्रांत कार्यालयात जाता येत नाही. अशा लोकांसाठी आरबीआयने सांगितले की, ते आरबीआयच्या कार्यालयात न येता 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात.

लोक त्यांच्या 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे रिझर्व्ह बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात पाठवू शकतात. ज्यांना स्थानिक कार्यालयात जाता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. याशिवाय लोकांना त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी TLR (ट्रिपल लॉक रिसेप्टेकल) फॉर्म भरावा लागतो.

19 मे रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या बँक नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, दिल्लीतील लॉकर ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT