Rule Change FASTag to GST from 1 march know what changes for common man  Sakal
Personal Finance

Rule Change: फास्टॅगपासून ते जीएसटी पर्यंत 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

1 March 2023 Rule Change: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैशाशी संबंधित असे अनेक नियम बदलत असतात ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. 1 मार्च 2024 पासून अनेक नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्ड, फास्टॅग ते जीएसटी असे अनेक नियम उद्यापासून बदलणार आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल.

राहुल शेळके

Rules Changing From 1 March 2024: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैशाशी संबंधित असे अनेक नियम बदलत असतात ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. 1 मार्च 2024 पासून अनेक नियम बदलणार आहेत. फास्टॅग ते जीएसटी असे अनेक नियम उद्यापासून बदलणार आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल. (Rule Change from 1 march know what changes for common man)

एलपीजी किंमत

एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात.

कंपन्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवतील अशी अपेक्षा आहे. 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, बेंगळुरूमध्ये 1055.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.

बँकांना 13 दिवस सुट्ट्या

मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील. या 14 दिवसांच्या सुट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. म्हणजेच साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त सणासुदीमुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत.

देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या आहेत त्या राज्यांमध्येच बँका बंद राहतील. मार्च महिन्यात शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे असे सण असल्याने बँका बंद राहणार आहेत.

फास्टॅग

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणजेच आजच तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करा. अन्यथा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तुमचा फास्टॅग निष्क्रिय करू शकतात किंवा ब्लॅकलिस्ट करू शकतात.

सोशल मीडियाचे नवीन नियम

सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

जीएसटी नियमांमध्ये बदल

केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 मार्च 2024 पासून GST नियम बदलत आहेत. आता 5 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-बिल तयार करता येणार नाही. शुक्रवारपासून हा नियम लागू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT