Rule Change From 1st March 2023 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, 1 मार्च 2023 पासून काही मोठे बदल झाले आहेत, त्यापैकी काही तुमच्या खिशाचा भार वाढवणार आहेत. होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.
आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय ट्रेनच्या टाइम टेबलपासून ते सोशल मीडियाचे नियमही बदलले आहेत.
8 महिन्यांनंतर एलपीजीच्या किंमती वाढल्या
होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका लागला आहे. गॅस वितरण कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सिलिंडरमध्ये ही वाढ तब्बल 8 महिन्यांनंतर दिसून आली आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दरही वाढले :
एलपीजी सिलिंडरसोबतच 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1769 रुपयांवरून 2,119 रुपये, मुंबईत 1,721 रुपयांऐवजी 2,071 रुपये, कोलकात्यात 1,870 रुपयांऐवजी 2,221 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,917 रुपयांऐवजी 2,268 रुपये झाली आहे.
बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे महाग :
बँक ऑफ इंडिया (BOI) ने निधी आधारित कर्ज दर (MCLR) म्हणजेच कर्जाच्या दरात 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन MCLR दर आज 1 मार्च 2023 पासून लागू करण्यात आला आहे.
यामुळे आता बँकेकडून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार असून ग्राहकांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. याआधी बंधन बँकेनेही मंगळवारी MCLR 16 बेसिस पॉईंटने वाढवला होता, जो 28 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.
12 दिवस बँकांना सुट्टी :
मार्च महिन्यात बँकांशी संबंधित काम असेल तर आरबीआयच्या सुट्ट्यांची यादी पाहूनच काम करा. वास्तविक, या महिन्यात होळीसह अनेक सण साजरे केले जात आहेत.
एकूण 12 दिवस बँक बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
रेल्वे वेळापत्रक बदलणार :
भारतीय रेल्वे मार्चमध्ये आपल्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे आणि त्याची यादी आज जाहीर केली जाऊ शकते. अहवालानुसार, 1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5 हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.
सोशल मीडिया नियम :
मार्च महिना सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी देखील खास आहे, कारण त्यात देखील बरेच बदल होणार आहे. अलीकडेच, भारत सरकारने आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत.
जे 1 मार्चपासून लागू होत आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आता नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.