SEBI Finfluencer New Rule: भांडवली बाजार नियामक सेबीने गुरुवारी सोशल मीडियावर आर्थिक बाबींशी संबंधित माहिती देणाऱ्या फायनान्फ्लुएंसर्सच्या नियमनाशी संबंधित नियमांना मंजुरी दिली. या अंतर्गत, Finfluencer ला ब्रोकर्ससारख्या नियमन केलेल्या संस्थांसोबत काम करण्यास मनाई केली आहे. याचा अर्थ असा की आता नोंदणी नसलेले आर्थिक Finfluencer शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्ला देऊ शकणार नाहीत.
प्रथमच या Finfluencerना सेबीमध्ये नोंदणी करावी लागेल. याशिवाय नियमांचेही पालन करावे लागणार आहे. गैर-नियमित Finfluencerशी संबंधित संभाव्य जोखमींवरील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. Finfluencers लोकांना पक्षपाती किंवा दिशाभूल करणारा सल्ला देखील देऊ शकतात. याची भीती सेबीला आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्ससह भागीदारीवरही बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियम लागू करण्यापूर्वी सेबीने सर्व भागधारक आणि उद्योगांकडून सल्ला मागितला होता. त्यानंतरच Finfluencerसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली.
याव्यतिरिक्त, नियामकाने SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (IAS) आणि संशोधन विश्लेषक (RAS) त्यांच्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्यासाठी एक इकोसिस्टम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना नोंदणीकृत नसलेल्या संस्था ओळखण्यास आणि त्यांच्यापासून दूर राहण्यास मदत होईल.
शिवाय, सेबीने तांत्रिक त्रुटींमुळे स्टॉक एक्सचेंजेसचे व्यवस्थापकीय संचालक (MDs) आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTOs) वरील आर्थिक दंड काढून टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.