Rulka Electricals IPO Sakal
Personal Finance

Rulka Electricals IPO : रुल्का इलेक्ट्रिकल्सचा आयपीओ खुला, जाणून घ्या प्राइस बँडसह इतर डिटेल्स...

सकाळ वृत्तसेवा

रुल्का इलेक्ट्रिकल्सचा आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. कंपनीने इश्यूसाठी प्राइस बँड 223-235 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. 21 मे पर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. इश्यूद्वारे 26.40 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

आयपीओअंतर्गत 19.80 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 6.60 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील. कंपनीचे शेअर्स एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्म इमर्जवर लिस्ट केले जातील.

रुल्का इलेक्ट्रिकल्सच्या आयपीओअंतर्गत एकूण 11.23 लाख शेअर्स विकले जातील. यापैकी 8.42 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय ओएफएसच्या माध्यमातून 2.8 लाख शेअर्स विकले जातील.

ओएफएसचा भाग म्हणून, प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 2.8 लाख शेअर्स शेअरहोल्डर अभय कांतीलाल शाह एचयुएफद्वारे विकले जातील. गुंतवणूकदार किमान 600 इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 41 हजार गुंतवावे लागतील.

रुल्का इलेक्ट्रिकल्स आपल्या बिझनेस ऍक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी या फंडचा वापर करेल. या व्यतिरिक्त, निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि सार्वजनिक ऑफर खर्चासाठीही वापरला जाईल.

कंपनी तिच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही हा निधी वापरणार आहे.बीलाइन कॅपिटल ऍडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेज रजिस्ट्रार आहेत.

रुल्का इलेक्ट्रिकल्सची स्थापना 2013 मध्ये झाली. कंपनी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल आणि फायर फायटिंग टर्नकी प्रकल्पांसाठी उपाय प्रदान करणारा टर्न-की प्रकल्प कॉन्ट्रॅक्टर आहे. कंपनी सर्व प्रकारच्या औद्योगिक प्लांट्ससाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग सेवाही प्रदान करते. रुल्का इलेक्ट्रिकल्स ही इलेक्ट्रिकल आणि फायर फायटिंग सोल्युशन कंपनी आहे.

कंपनी इलेक्ट्रिकल सोल्युशन्स, इलेक्ट्रिकल पॅनेल्स, सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्ट्स, टर्नकी इलेक्ट्रिकल वेअरहाउसिंग प्रोजेक्ट्स, इलेक्ट्रिकल कमर्शियल इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, मेंटेनन्स सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स आणि डेटा आणि व्हॉईस केबलिंग इन्स्टॉलेशनसह अनेक सेवा पुरवते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT