Sachin Joglekar writes Investing in Small Cap mutual fund money management  sakal
Personal Finance

Small Cap Mutual Fund : स्मॉल इज ब्युटिफूल

विस्तृत संशोधन आणि अनुभवी निधी व्यवस्थापकांसह सुसज्ज, म्युच्युअल फंड घराणी केवळ चांगल्या स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करतात.

सकाळ वृत्तसेवा

विस्तृत संशोधन आणि अनुभवी निधी व्यवस्थापकांसह सुसज्ज, म्युच्युअल फंड घराणी केवळ चांगल्या स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करतात.

- सचिन जोगळेकर

रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एल अँड टी यासारख्या आजच्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरची अनेक दशकांपूर्वी खरेदी करून ठेवलेल्या गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या परताव्याची कल्पना करा? फक्त गेल्या दशकात, या शेअरनी वार्षिक सरासरी १४ ते २० टक्के दराने परतावा दिला आहे. तुम्ही हे दिग्गज २०-३० वर्षांपूर्वीच हेरले असतील, तर तुमचा नफा अनेकपटींनी वाढलेला असेल.

स्मॉल कॅपमधील गुंतवणूक

उद्याचे मिड कॅप आणि लार्ज कॅप बनण्याची क्षमता असलेल्या छोट्या-आकाराच्या कंपन्या निवडून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास स्थापित मानदंडापेक्षा जास्त परतावा मिळवण्याची मोठी संधी असते.

मात्र, त्यासाठी पोर्टफोलिओ आधारित दृष्टिकोन आवश्यक आहे. कारण हे शेअर लहान कंपन्यांचे आहेत, ज्यात जोखीम अधिक असते. मिड कॅप, लार्ज कॅप शेअरपेक्षा ते अधिक अस्थिर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्षही होते.

या कंपन्यांकडे संभाव्य यशस्वी व्यवसायप्रारूप, वाढीची क्षमता, नावीन्यपूर्ण उत्पादने किंवा सेवा असल्या, तरीही त्यांचा लहान आकार पाहाता, गुंतवणूकदार त्यांच्यातील मोठ्या कसलेल्या खेळाडूचीच निवड करतो. थोडक्यात, ‘स्मॉल इज ब्युटिफूल’ अर्थात लघुरूप सुंदर असले, तरी ते काहीवेळा ध्यानीमनीही येत नाही.

जोखीम

स्मॉल कॅपमध्ये थेट गुंतवणुकीचे काही धोके आहेत. बऱ्याच स्मॉल कॅप कंपन्या या एकखांबी तंबू असतात, त्यामुळे कंपनीतील महत्त्वाच्या व्यक्तीचे काही बरे-वाईट होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो. अनेक छोट्या कंपन्यांची आर्थिक स्थिती मोठ्या कंपन्यांइतकी निरोगी नसते, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. लहान आकारामुळे मोठे खेळाडू त्यांना मागे टाकू शकतात.

म्युच्युअल फंडांद्वारे संधी

विस्तृत संशोधन आणि अनुभवी निधी व्यवस्थापकांसह सुसज्ज, म्युच्युअल फंड घराणी केवळ चांगल्या स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करतात. हे फंड त्याच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवतात.

तरलतेच्या उद्देशाने, उर्वरित भाग लार्ज कॅप व मिड कॅप शेअरमध्ये गुंतवू शकतात. चांगले स्मॉल कॅप फंड दीर्घकालीन दृष्टिकोनातून शेअरची खरेदी करतात. या फंडांचा पाच व दहा वर्षे श्रेणीचा सरासरी परतावा अनुक्रमे वार्षिक १६ टक्के व २१ टक्के आहे.

सात ते दहा वर्षांसाठी गुंतवणुकीची तयारी व जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी चांगल्या स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. एसआयपी हा त्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे.

(लेखक सार्थ वेल्थ प्रा.लि.चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT