Sachin Tendulkar to enter the semiconductor game esakal
Personal Finance

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव पिचवरून आला 'चिप'मध्ये! सचिन तेंडूलकरची RRP कंपनीत आहे मोठी गुंतवणूक

Sandip Kapde

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन युनिटचे उद्घाटन केले. नवी मुंबईतील या युनिटमुळे भारताची परदेशी सेमीकंडक्टर चिपवरची अवलंबित्व कमी होईल. RRP Electronics Ltd ही कंपनी, ज्यामध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा सहभाग असून तो कंपनीत एक गुंतवणूकदार आहे. या प्रकल्पात 12,035 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, सचिन तेंडुलकर, RRP Electronics Ltd चे अध्यक्ष राजेंद्र चोदानकर आणि भारतातील ऊर्जाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अनिल काकोडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सचिन तेंडुलकरचा संदर्भ घेत विनोदी शैलीत म्हटले, "सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आहे, पण जेव्हा तो पिचवरून चिपमध्ये पोहोचला, तेव्हा आम्हाला कळलेच नाही. पिचवर अंपायर असतो, पण चिपला कंडक्टर लागतो."

या गुंतवणुकीत पुढील पाच वर्षांत कंपनीच्या युरोपियन कंझोर्टियमसोबतच्या भागीदारीत गुंतवणूक केली जाईल. सचिन तेंडुलकर यांनी यावेळी वक्तव्य करताना म्हटले, "भारताच्या उदयोन्मुख उद्योगांना पाठिंबा देणे हे एक रोमांचक कार्य आहे, जे भविष्यात जागतिक स्तरावर सकारात्मक प्रभाव टाकतील."

सेमीकंडक्टर उद्योगात महाराष्ट्राची मोठी झेप-

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या युनिटमध्ये सुमारे 400 कामगार काम करतील. आतापर्यंत RRP Electronics Ltd ने 12,035 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या काळात कंपनी 24,538 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. सेमीकंडक्टर चिपची वाढती मागणी पाहता, हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण आजकाल लहान, जलद आणि कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी वाढली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे सांगितले की, “राज्य सरकार या उद्योगांचे समर्थन करेल आणि त्यांना आवश्यक ती मदत पुरवेल."

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, "कोरोना काळातील पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे आपल्याला चीनसारख्या देशांवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळेच आपल्या देशात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्स असणे आवश्यक ठरले आहे. महाराष्ट्र हा सेमीकंडक्टर धोरण तयार करणारा पहिला राज्य आहे आणि या क्षेत्रात एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. आरआरपी ही या उपक्रमाची आघाडी घेणारी कंपनी आहे. येत्या काळात, सेमीकंडक्टर चिपवर आधारित असलेल्या जगभरातील उपकरणांमध्ये 'मेड इन इंडिया' चिप दिसतील."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT