Sachin Tendulkar Net Worth Sakal
Personal Finance

Sachin Tendulkar Net Worth: सचिन, विराट आणि धोनीपेक्षाही आहे श्रीमंत? जाणून घ्या किती कोटींचा आहे मालक?

क्रिकेट देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 50वा वाढदिवस आहे.

राहुल शेळके

Sachin Tendulkar Birthday: क्रिकेट देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. क्रिकेट खेळताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सध्या त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचे चाहते त्याला आजही मास्टर-ब्लास्टर या नावाने ओळखतात. आजही त्याची फॅन फॉलोइंग मोठी आहे.

आज सचिन तेंडुलकर त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनकडे एकापेक्षा जास्त वाहने आहेत. सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती आहे याबद्दल जाणून घेऊ.

भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची संपत्ती करोडोंची आहे. त्यानी आपल्या कामाने आणि नावाने करोडोंची संपत्ती कमावली आहे.

आज सचिन ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचणे प्रत्येकाच्याच क्षमतेत नसते. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने क्रिकेट विश्वात प्रवेश केला होता आणि आज त्याच्याकडे जवळपास 1650 कोटींची संपत्ती आहे.

सचिनने मुंबईतील वांद्रे येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. ज्याची किंमत 39 कोटी असून, 2007 मध्ये त्यानी तो खरेदी केला होता.

सध्या त्याच्या बंगल्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. याशिवाय बीकेसीमध्ये त्याची एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. याशिवाय सचिनचा आणखी एक आलिशान बंगला केरळमध्ये आहे, त्याची किंमत सुमारे 78 कोटी आहे.

सचिनचे कार कलेक्शन:

सचिनजवळील बंगल्याशिवाय त्याला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा जास्त वाहने आहेत. त्याची पहिली कार मारुती 800 होती. मात्र या कारनंतर त्याने अनेक आलिशान वाहने खरेदी केली.

सचिन सध्या 20 कोटींच्या कारमधून प्रवास करतो. सचिनच्या लक्झरी वाहनांमध्ये Ferrari 360 Moden, BMWi8, BMW7, 750Li M sport, Nissan GT-R, Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre यांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरचे काही विक्रम:

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000 धावांचा आकडा गाठणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्याने 76 वेळा (कसोटी-15, ODI-62)  प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला होता.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,076 चौकार मारले. सचिनपेक्षा जास्त चौकार कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत.

  • रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये पदार्पणात शतक झळकावले. इतर कोणत्याही खेळाडूला हे करता आले नाही.

  • तेंडुलकर-गांगुली यांनी मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 शतकी भागीदारी केली, जो एक विश्वविक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT