safe investment three us bankrupt gold finance money management Sakal
Personal Finance

सर्वाना हवेहवेसे सोनेच!

जागतिक पातळीबरोबर भारतातही सोन्याने भाव खाल्ला

अमित मोडक

जागतिक पातळीबरोबर भारतातही सोन्याने भाव खाल्ला

जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता, महागाई यांचे मळभ कायम असताना अमेरिकेतील बँकांच्या पेचामुळे साऱ्या वित्तीय जगाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील तीन बँका गेल्या आठवड्यात बुडाल्यानंतर आणखी एक बँकही दिवाळखोरीत जाण्याची शक्यता वाढली आहे.

परिणामी संपूर्ण आर्थिक जगत धास्तावले असून, नव्या मंदीकडे वाटचाल तर होणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळेच जागतिक पातळीबरोबर भारतातही सोन्याने भाव खाल्ला आहे.  गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यापासून विशेषतः अमेरिकेतील बँकांच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

सोन्याच्या भावात मोठी वाढ

गुंतवणूकदारांनी पारंपरिक, सुरक्षित व सार्वभौम असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक पातळीवर आठवड्यात सोने प्रति औंस (३१.१० ग्रॅम) ६.४८ टक्के वाढून १९८८.८५ डॉलरच्या भावपातळीवर पोचले. त्या आधीच्या आठवड्यात सोने प्रति औंस १८६७ डॉलरवर होते.

भारतात ‘एमसीएक्स’वर सोने प्रति दहा ग्रॅम ५९,४६१ रुपयांच्या उच्चांकावर गेले. या पूर्वीचा सोन्याचा उच्चांक ५९,४२० रुपये होता. आठवड्यात सोन्यात ५.८६ टक्के वाढ आहे. गेल्या आठड्यात सोने ५६,१३० रुपयांच्या पातळीवर होते. वर्षभराचा विचार केल्यास सोन्याने आठ टक्के म्हणजे सुमारे ४,३६६ रुपयांचा प्रति दहा ग्रॅममागे परतावा दिला आहे.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक या बँकांची पत गेल्यामुळे डॉलेक्स इंडेक्सही घसरला आहे. गुंतवणूकदरांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केल्याने शेअर बाजार, रोखे, महसुली परतावा आणि अन्य गुंतवणूक पर्यायांवर दबाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हची बैठक २१ व २२ मार्च रोजी होणार असून, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

एकूण परिस्थिती पाहत जाणकाऱ्यांच्या मतानुसार, फेडरलकडून व्याजदराबाबत नरमाईची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सोन्यात पुन्हा तेजी दिसू शकते.  फेडरल रिझर्व्हची निर्णय एकूण वित्तीय जगासाठी महत्त्वाची असली, तरी भू-राजकीय अस्थिरता, महागाई आदींचा विचार केल्यास सार्वभौम गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्यास प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

परिणामी, आगामी काळात सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. जागतिक पातळीवर नजीकच्या काळात प्रति औंस २००० डॉलरवर जाऊ शकते. भारतापुरता विचार करायचा झाल्यास प्रति दहा ग्रॅम ६२ हजार रुपयांची पातळी ओलांडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

अल्पकालीन दबावाची शक्यता

बऱ्याच डेट व हेज म्युच्युअल फंडांना त्यांच्याकडे असलेल्या सर्व सिक्युरिटीजमध्ये मुद्दल रकमेवर नुकसान होत आहे. तसेच, त्यांच्याकडे असलेल्या गुंतवणुकीतील सोने त्यांचे नुकसान भरून काढण्यास समर्थ आहे. त्यामुळे त्यांनी काहीप्रमाणात सोने विकल्यास अल्पकाळासाठी सोन्यात मंदी येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT