eRupee By SBI: ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने सोमवारी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे कोट्यवधी लोक आता UPI द्वारे थेट डिजिटल रूपयांचे व्यवहार करू शकतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन उपक्रमामुळे डिजिटल रुपयाच्या वापराला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने काही काळापूर्वी डिजिटल चलन लाँच केले होते, ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा CBDC असेही म्हणतात. सुरुवातीला रिझव्र्ह बँकेच्या ई-रुपी म्हणजेच डिजिटल रुपयाशी संबंधित प्रकल्पासह एकत्र आलेल्या बँकांमध्ये एसबीआयचाही समावेश आहे. CBDC त्याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यावर क्रिप्टो चलने कार्य करतात.
एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक या सेवेचा लाभ eRupee by SBI अॅपद्वारे घेऊ शकतात. या अॅपच्या मदतीने, वापरकर्ते कोणत्याही दुकानात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी UPI QR कोड स्कॅन करू शकतात आणि डिजिटल रूपयांसह थेट पेमेंट करू शकतात.
बँकेने म्हटले आहे की या उपक्रमामुळे लोकांमध्ये डिजिटल चलनाचा वापर वाढेल. अशाप्रकारे, लोक आता दैनंदिन व्यवहारात डिजिटल पैशाचा अधिक वापर करू शकतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC ची घोषणा केली होती.
त्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून सेंट्रल बँक डिजिटल चलनाची चाचणी सुरू केली. सध्या, खाजगी क्षेत्रातील बँकांसह, जवळजवळ सर्व प्रमुख बँका CBDC मध्ये सामील झाल्या आहेत. SBI चे सामील होणे विशेष आहे कारण ग्राहकांची संख्या, शाखांची संख्या आणि दुर्गम भागात पोहोचण्याच्या बाबतीत इतर सर्व बँकांपेक्षा SBI खूप पुढे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.