SBI Rate Hike Sakal
Personal Finance

SBI Rate Hike: एसबीआयचा करोडो ग्राहकांना झटका! आजपासून कर्ज झाले महाग, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

SBI Rate Hike: सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण SBIने आजपासूनच व्याजदरात वाढ केली आहे. एवढेच नाही तर वाढीव दरांची अंमलबजावणीही 15 जुलैपासून करण्यात आली आहे.

राहुल शेळके

SBI Rate Hike: सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण SBIने आजपासूनच व्याजदरात वाढ केली आहे. एवढेच नाही तर वाढीव दरांची अंमलबजावणीही 15 जुलैपासून करण्यात आली आहे. याचा अर्थ आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहे.

वाहन कर्ज आणि सर्व प्रकारच्या कर्जांचा यात समावेश आहे. SBI ने MCLR वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. SBI ने सध्या EBLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही. MCLR वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

व्याजदर इतके वाढले

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर सोमवारी एक माहिती शेअर करण्यात आली. ज्यामध्ये बँकेने आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) मध्ये बदल केला. बदलाअंतर्गत, MCLR 5 ते 10 आधार अंकांनी वाढवण्यात आला आहे. याचा अर्थ MCLR 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के झाला आहे.

आजपासूनच बदलांची अंमलबजावणी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. MCLR मधील बदलामुळे SBI ची सर्व कर्जे महाग होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवे दर

  • एका महिन्याच्या कर्जाच्या कालावधीवरील MCLR 5 bps ने वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे.

  • तीन महिन्यांच्या कर्ज कालावधीवर MCLR 10 bps ने वाढवून 8.4 टक्के करण्यात आला.

  • सहा महिन्यांच्या कर्ज कालावधीवर MCLR 10 bps ने वाढवून 8.75 टक्के करण्यात आला.

  • एका वर्षाच्या कर्ज कालावधीवरील MCLR 10 bps ने वाढवून 8.85 टक्के करण्यात आला आहे.

  • दोन वर्षांच्या कर्जाच्या कालावधीवर MCLR 10 bps ने वाढवून 8.95 टक्के करण्यात आला.

  • तीन वर्षांच्या कर्जाच्या कालावधीवर MCLR 5 bps ने वाढवून 9 टक्के करण्यात आला.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स, हा किमान व्याजदर आहे ज्याच्या खाली बँक आपल्या ग्राहकांना पैसे देऊ शकत नाही. या वाढीमुळे कर्जाचे व्याजदरही वाढणार आहेत. सर्व बँकांचे व्याजदर ठरविण्याची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला.

MCLR चा तुमच्या वैयक्तिक आणि वाहन कर्जाच्या EMI वर थेट परिणाम होतो. MCLR वाढल्यामुळे नवीन कर्ज महाग होतात. याशिवाय, तुमच्या सध्याच्या कर्जाचा EMI देखील वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT