IPO funds sakal
Personal Finance

SEBI : कर्जफेडीसाठी ‘आयपीओ’चा निधी नको,अन्य पर्याय वापरण्याची ‘सेबी’कडून कंपन्यांना सूचना

IPO funds : भारतीय कंपन्यांनी आयपीओद्वारे उभारलेल्या निधीचा वापर प्रवर्तकांच्या कर्जफेडीसाठी करण्यास ‘सेबी’ने आक्षेप घेतला आहे. यामुळे अनेक कंपन्यांचे आयपीओ पुढे ढकलण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अनेक कंपन्या प्राथमिक समभाग विक्री अर्थात आयपीओद्वारे शेअर बाजारात प्रवेश करून भांडवल उभारतात. मात्र, या निधीचा वापर कंपनीच्या प्रवर्तकांच्या कर्जफेडीसाठी करण्यावर भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) आक्षेप घेतला आहे.

‘सेबी’ने कंपन्यांना वित्तपुरवठ्याचे इतर मार्ग वापरून प्रवर्तकांच्या कर्जाची परतफेड करण्यास सांगितले आहे. ‘सेबी’च्या या आक्षेपामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचा आयपीओ आणणे पुढे ढकलले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

भांडवल बाजाराच्या नियमांनुसार, प्रवर्तक किंवा प्रवर्तक समूह कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीला आयीपओतून मिळालेला निधी वापरण्यावर बंदी घालणारे कोणतेही नियम नाहीत. परंतु, ‘सेबी’ने आता यावर आक्षेप घेतला असून, या समस्येमुळे काही आयपीओ मंजुरीसाठी रखडले आहेत.

आयपीओची परवानगी घेण्यासाठी ‘सेबी’कडे दाखल करण्यात येणाऱ्या अर्जामध्ये (डीआरएचपी) कंपन्या त्यांनी उभारलेल्या निधीचे काय करणार आहेत, हे स्पष्ट करणे गरजेचे असते. यात अनेक कंपन्या या निधीतील काही भाग प्रवर्तकांच्या किंवा कंपनीच्या कर्जफेडीसाठी वापर करणार असल्याचा उल्लेख करतात.

आता ‘सेबी’ने कंपन्यांना प्रवर्तक कर्जांची परतफेड वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन करण्यास सांगितले आहे आणि नंतर त्या वित्तीय संस्थांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आयपीओतून मिळालेला निधी वापरण्यास सांगितले आहे.

आयपीओच्या पैशातून प्रवर्तक कर्जाची थेट परतफेड करण्याऐवजी वित्तीयसंस्थाचे कर्जफेड करण्याचा मार्ग स्वीकारण्याची सूचना ‘सेबी’ने केली आहे. दरम्यान, व्यापारी बँकांनी ‘सेबी’ला तिच्या या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या आठवड्यात यावर मार्ग शोधण्यासाठी बैठक होण्याची शक्यता आहे.

शापूरजी पालनजी समूहाकडून बदल

शापूरजी पालनजी समूहाची प्रमुख बांधकाम कंपनी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आयपीओसाठी प्रस्ताव दाखल केल्यावर ‘सेबी’कडून प्रवर्तकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ‘आयपीओ’तील उत्पन्नाचा काही भाग वापरण्याबाबत दुसरा पर्याय निवडण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार, कंपनीने शापूरजी पालनजी फायनान्सच्या कर्जासाठी राखून ठेवलेले २५ कोटी रुपये आता प्रवर्तकांचे स्टेट बँक ऑफ इंडियातील कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील, असा बदल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT