Sanstar Ltd Sakal
Personal Finance

Sanstar Ltd IPO : सॅनस्टार लिमिटेडच्या आयपीओला सेबीची मंजूरी, 425-500 कोटीच्या आयपीओचा अंदाज...

सकाळ वृत्तसेवा

Sanstar Ltd IPO : प्लांट बेस्ड स्पेशालिटी प्रोडक्ट्स कंपनी सॅनस्टार लिमिटेड (Sanstar Limited) लवकरच आपला आयपीओ लाँच करणार आहेत. यासाठी कंपनीला बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) या आयपीओअंतर्गत 4 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

याव्यतिरिक्त, प्रमोटर्स आणि प्रमोटर्स ग्रुप विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सद्वारे ऑफर फॉर सेलअंतर्गत (OFS) 80 लाखांपर्यंत शेअर्स विकले जातील. आयपीओचा आकार 425-500 कोटी असू शकतो असा अंदाज बाजारातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

अहमदाबादस्थित कंपनीने या वर्षी जानेवारीमध्ये सेबीकडे आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला 30 एप्रिलला ऑब्जर्वेशन लेटर मिळाले. कोणत्याही कंपनीला आयपीओ लाँच करण्यापूर्वी ऑब्जर्वेशन लेटर घेणे आवश्यक आहे.

कंपनी 40 लाख इक्विटी शेअर्सच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते. असे प्लेसमेंट पूर्ण झाल्यास, नवीन आयपीओचा आकार कमी केला जाईल. ड्राफ्ट पेपर्सनुसार, फ्रेश इश्यूमधून उभारलेला निधी कंपनीच्या धुळे फॅसिलिटीच्या विस्तारासाठी भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी वापरला जाईल.

याशिवाय, हा निधी कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील वापरला जाईल. सॅनस्टार ही भारतातील प्लांट-बेस्ड स्पेशालिटी प्रोडक्ट्स आणि इनग्रिडिएंट्स सोल्यूशन्सची आघाडीची उत्पादक आहे.

महाराष्ट्रातील धुळे आणि गुजरातमधील कच्छ येथील दोन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमधील त्याची प्रतिदिन क्षमता 1100 टन आहे. बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे इक्विटी शेअर्स लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. पँटोमॅथ कॅपिटल ऍडवायझर्स हा आयपीओसाठी एकमेव बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT