SEBI extends Dec 31 deadline for mutual fund and demat account nomination Sakal
Personal Finance

SEBI: म्युच्युअल फंड, डी-मॅट नामांकनाला मुदतवाढ; काय आहे नवीन तारीख?

राहुल शेळके

मुंबई, ता. २७ ः म्युच्युअल फंड योजना आणि डी-मॅट खात्यांसाठी नामांकन करण्याची अंतिम मुदत आता ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार होती.

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने आज एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे अद्याप हे काम न केलेल्या असंख्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. आता ३० जूनपर्यंत गुंतवणूकदारांनी नामांकन करणे किंवा ते करायचे नसल्यास तशी माहिती देणे अनिवार्य आहे.

अनेक गुंतवणूकदार वेळेत ही प्रक्रिया करू न शकल्याचे कंपन्यांनी सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी, डी-मॅट खाती आणि म्युच्युअल फंड फोलिओसाठी नामांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘सेबी’ने म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत जवळ आल्यावर, ‘सेबी’ने ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. गुंतवणूकदार नामांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना फंड खाते किंवा डी-मॅट खात्यांमधून पैसे काढणे शक्य होत नाही.

मुदतवाढीमुळे ही समस्या दूर झाली आहे. रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या आकडेवारीनुसार, सुमारे २५ लाख पॅन धारकांनी सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांच्या म्युच्युअल फंड फोलिओमध्ये नामांकन केले नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा होणार दूर? 'हा' असणार नवा प्लॅन

Manoj Jarange: ..तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो; अंतरवाली सराटीच्या मार्गावर बॅरिकेड्स लावल्याने जरांगेंचा पोलिसांना इशारा

Morning Breakfast Recipe: घरीच झटपट बनवा शिंगाड्याच्या पिठाचा पौष्टिक हलवा, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT