SEBI Decision for Market Hours: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंग तास वाढवण्याचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा प्रस्ताव मागे घेतला आहे. ब्रोकरमध्ये एकमत नसल्यामुळे सेबीने हा निर्णय घेतला आहे. एनएसईने डेरिव्हेटिव्ह मार्केट संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान अतिरिक्त तीन तास खुले ठेवण्यासाठी मार्केट रेग्युलेटरकडे अर्ज दाखल केला होता.
NSE ने असा युक्तिवाद केला की यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना जागतिक संकेतांचे मूल्यांकन करण्यास आणि त्यानुसार खरेदी-विक्री करण्यास मदत होईल. मात्र शेअर ब्रोकर्समध्ये याबाबत एकमत झाले नाही. यामुळे त्यांचा खर्च वाढेल आणि अतिरिक्त तंत्रज्ञानाचीही गरज भासेल, असे ब्रोकर्सनी सांगितले.
NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आशिष कुमार चौहान यांनी सांगितले की हा प्रस्ताव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. एनएसईच्या निकालांवरील विश्लेषकांशी चर्चेदरम्यान चौहान म्हणाले, सध्या व्यापाराचे तास वाढवण्याची कोणतीही योजना नाही. कारण या संदर्भात ब्रोकर्सकडून कोणताही संवाद नाही. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, सेबीने आमचा अर्ज नाकारला. त्यामुळे बाजाराची वेळ वाढवण्याची योजना तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
ब्रोकर्सचे असे मत होते की व्यापाराचे तास वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संसाधनांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक आवश्यक आहे आणि ते कदाचित फायदेशीर नाही. जे ब्रोकर्स या प्रस्तावाच्या बाजूने होते त्यांनी सांगितले की यामुळे जागतिक बाजारातील नकारात्मक बातम्यांपासून बचाव करण्यात मदत होऊ शकते.
देशांतर्गत बाजार दुपारी 3:30 वाजता बंद होतो, तर युरोपियन बाजारपेठेतील व्यवहार या वेळी शिखरावर असतात. अमेरिकन बाजार भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता उघडतो.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी देखील व्यापाराचे तास वाढवण्यापूर्वी सिस्टमची क्षमता वाढवण्यावर आणि इतर आवश्यक तयारी करण्यावर भर दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.