services sector in country performed well in July demand and investment in technology Sakal
Personal Finance

Service Sector : मागणी आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक यामुळे देशातील सेवा क्षेत्राची कामगिरी जुलै महिन्यात उत्तम

मजबूत मागणी आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक यामुळे देशातील सेवा क्षेत्राने जुलैमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जूनच्या तुलनेत वाढीचा वेग थोडासा कमी झाला असला, तरीही सेवा क्षेत्राची वाढ लक्षणीय असल्याचे एचएसबीसी इंडियाने मासिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मजबूत मागणी आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक यामुळे देशातील सेवा क्षेत्राने जुलैमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जूनच्या तुलनेत वाढीचा वेग थोडासा कमी झाला असला, तरीही सेवा क्षेत्राची वाढ लक्षणीय असल्याचे एचएसबीसी इंडियाने मासिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

जुलैमध्ये सर्व्हिसेस बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स ६०.३ असून, जूनमधील ६०.५ वरून तो अंशतः कमी झाला आहे. जुलैमध्ये सेवा क्षेत्रातील उलाढाली किंचित मंद गतीने वाढल्या. प्रामुख्याने देशांतर्गत मागणीमुळे नव्या व्यवसायात वाढ झाली आहे.

आगामी काळाबाबत सेवा कंपन्या पुढील वर्षाच्या दृष्टिकोनाबद्दल आशावादी आहेत, असे एचएसबीसीचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले. जगभरातून भारतीय सेवांच्या मागणीत वाढ होत असून, ऑस्ट्रिया, ब्राझील, चीन, जपान, सिंगापूर, नेदरलँड आणि अमेरिका या देशांमधून मोठी मागणी आहे.

अनुकूल आर्थिक परिस्थितीमुळेही सेवा कंपन्यांमध्ये कर्मचारीभरती वाढत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. किंमतीच्या आघाडीवर, उच्च वेतन आणि भौतिक खर्चामुळे व्यावसायिक खर्चात वाढ होत आहे. सात वर्षांसाठी सेवांच्या तरतुदीसाठी आकारल्या जाणाऱ्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ होण्यास खर्चाचा दबाव आणि सकारात्मक मागणीचा कल कारणीभूत ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: पवारांवर बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली, अजित पवार भडकले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

Latest Maharashtra News Updates : सदाभाऊ खोत यांच्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात निदर्शने

मीडियाचं खोटं आणि गोध्रा हत्याकांडाचं सत्य उघड होणार; विक्रांत मासीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलरचा धुमाकूळ

Prajakt Tanpure: पराभवाची चाहुल लागल्याने कर्डिले सैरभैर; निष्क्रिय कारभारामुळे त्‍यांना जनतेने नाकारले

Fashion Tips: लग्नसमारंभात दिसाल सर्वात हटके, जुन्या साड्यांचा वापर करून बनवा डिझायन ड्रेस

SCROLL FOR NEXT