seventy thousand crore contracts in Davos; Which projects will come in the Maharashtra  Sakal
Personal Finance

Davos 2024: दावोसमध्ये तब्बल सत्तर हजार कोटींचे करार; कोणते प्रकल्प राज्यात येणार?

Davos 2024: राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर आज दावोस येथे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’च्या दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर आज दावोस येथे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’च्या दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

‘ग्रीन हायड्रोजन’साठी प्रकल्प

‘ग्रीन हायड्रोजन’प्रकल्पासाठी ‘आयनॉक्स एअर प्रॉडक्शन’ बरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. ‘आयनॉक्स’ ही कंपनी अमेरिकेतील औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी आहे.

जिंदाल उद्योगसमूहाशी करार

देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या बी. सी. जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावरही आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात पाच हजार नोकऱ्या निर्माण होतील.

‘एआय हब’

महाराष्ट्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब’ निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स यांच्यात चार हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.

महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

‘ह्युंदाई’ गुंतविणार सात हजार कोटी

ह्युंदाई मोटर्स भारतात सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जनरल मोटर्सकडून नुकत्याच खरेदी केलेल्या पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी कंपनी ही गुंतवणूक करणार आहे.

दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या करारावर स्वाक्षरी केली जाईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील संदेशाद्वारे ही माहिती दिलीआहे. त्यांनी ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ किम उनसो, कार्यकारी संचालक जेडब्ल्यू रयू आणि इतर अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. कंपनीचा भारतातील हा दुसरा प्रकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT