स्थूलता आणि हालचाल या परस्परविरोधी गोष्टी आहेत. हत्ती क्वचितच बसतो. बसला तर उठणे त्याला कठीण जाते. त्याची चाल संथ-गंभीर असते. परंतु एखादी माशी मात्र आकाशात झटकन भरारी मारू शकते. शेअर बाजारात काही कंपन्यांच्या शेअरचेदेखील तसेच असते. शेअरचे ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ हे त्याची ‘स्थूलता’ दर्शविते.
अशा कंपनीच्या शेअरभावात फारशी वाढ होत नसते. हा शेअर चढत-चढत वर येऊन पोहचलेला असतो. अशा कंपन्यांना आपण जेथे पोहचलो आहोत, तेथे राहण्यासाठी खटपट करावी लागते. त्यांचा वेग मंदावतो. उलट छोट्या कंपन्यांचे शेअर हरणासारखे चपळ असतात. त्यांच्यातील वाढ वेगवान असते. असे शेअर प्रसंगी जास्त फायदा देऊन जातात.
कमी बाजारभाव, कमी मार्केट कॅपिटलायझेशन; परंतु जास्त परतावा देणारे शेअर : आयआरसीटीसी, आयआरएफसी, रेलटेल, रेल विकास निगम, पॉवरग्रीड, ऑईल इंडिया, टाटा कन्झुमर प्रॉडक्टस, झोमॅटो, एनएचपीसी, कॅनरा बँक, टोरेंट फार्मा आदी अनेक.
अलीकडे घसरलेला शेअर बाजार गुंतवणूकसंधी देत आहे. अशावेळी अभ्यासपूर्ण जोखीम घेण्यास हरकत नसावी.
हिंदुस्थान युनिलिव्हर-५७३६८७- २४४०- (२)- (५)- (६)- १
एचडीएफसी बँक -१०८३२८०- १४४०- (३)- (१३)- (१४)- (१)
एशियन पेंट्स -२८७७०६- २९४९ -(२)- (१५)- ७ -(५)
कोटक महिंद्र बँक -३५५५११ -१७७५ -३- (६)- २ -(२)
डी-मार्ट -२४२५७७ -३७४५ -२ -२- ६- ३०-
मारूती सुझुकी -३१४०३१- ९८८०- (५)- ३ -१५ -२४
डाबर इंडिया- ९५०८७ -५३३ -३ -(५) -(५)- (१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.