shree Tirupati Balajee Agro Trading Company IPO to come this year SEBI approval Sakal
Personal Finance

श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा आयपीओ यावर्षी येणार, सेबीची मंजुरी...

श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीला आयपीओसाठी बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा आयपीओ येईल अशी शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीला आयपीओसाठी बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा आयपीओ येईल अशी शक्यता आहे. यावर्षी मार्चमध्ये त्यांनी आयपीओसाठीचे पेपर पुन्हा दाखल केले होते. श्री तिरुपती बालाजी ऍग्रो ट्रेडिंग कंपनीला 12 जुलैला ऑब्जर्वेशन लेटर जारी केले आहे.

कोणत्याही कंपनीने ऑब्जर्वेशन लेटर जारी केल्यापासून एक वर्षाच्या आत आयपीओ लाँच करणे आवश्यक आहे. या पब्लिक इश्यू अंतर्गत एकूण 2.04 कोटी शेअर्स विकले जातील, ज्यामध्ये फ्रेश शेअर्स तसेच ओएफएस यांचाही समावेश आहे. आयपीओअंतर्गत 1.47 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, प्रमोटर बिनोद कुमार अग्रवाल यांच्या ओएफएसद्वारे 56.9 लाख शेअर्स विकले जातील.

बल्क पॅकेजिंग सोल्युशन्स प्रोवायडरमध्ये प्रमोटर अग्रवाल यांचा 88.38 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित शेअर्स सचिन मोहनलाल काकरेचा आणि ॲम्पल व्यापर सारख्या सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे आहेत. पीएनबी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस आणि युनिस्टोन कॅपिटल या इश्यूसाठी मर्चंट बँकर आहेत.

कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 57.3 कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी कंपनी 24.24 कोटी वापरणार आहे. याशिवाय, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्याची योजना आहे.

श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ही कंपनी फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (म्हणजे मोठ्या लवचिक पिशव्या आणि इतर औद्योगिक पॅकेजिंग उत्पादने जसे की विणलेल्या पोत्या, विणलेले कापड आणि अरुंद कापड) तयार करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT