Singapore recalls India's Everest Masala, claims it is unfit for human consumption Sakal
Personal Finance

Everest Masala: 'धोकादायक' एव्हरेस्टच्या मसाल्यात कीटकनाशके? 'या' देशाने मसाला बाजारातून काढून टाकण्याचे दिले आदेश

Everest Fish Curry Masala: सिंगापूरने भारतातून आयात केलेले प्रसिद्ध मसाले उत्पादन एव्हरेस्ट फिश करी मसाला बाजारातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. मसाल्यामध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडचे जास्त प्रमाण हे त्यामागचे कारण आहे.

राहुल शेळके

Everest Fish Curry Masala: सिंगापूरने भारतातून आयात केलेले प्रसिद्ध मसाले उत्पादन एव्हरेस्ट फिश करी मसाला बाजारातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. मसाल्यामध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कीटकनाशकाचा वापर सूक्ष्मजीवांचे प्रदूषण कमी करण्यासाठी कृषी उत्पादनांवर फवारणी करण्यासाठी केला जातो. मात्र, त्याचा खाद्यपदार्थांमध्ये वापर करण्यास बंदी आहे. ते मानवी आरोग्यासाठी योग्य नाही. असे सिंगापूर फूड एजन्सीने सांगितले आहे. (Singapore recalls India's Everest Masala, claims it is unfit for human consumption)

एव्हरेस्ट फिश करी मसाला परत मागवण्याचा आदेश

सिंगापूर फूड एजन्सीने एक निवेदन जारी करून सांगितले की, सेंटर फॉर फूड सेफ्टीने एव्हरेस्ट फिश करी मसाला परत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. हा मसाला ब्रँड सिंगापूरमधील SP मुथिया अँड सन्स Pte Ltd ने आयात केला होता. SFA ने कंपनीला हे उत्पादन परत मागवण्याची सूचना केली आहे.

एसएफएने ग्राहकांना सध्या त्यांच्या जेवणात एव्हरेस्ट मसाला वापरू नये असे आवाहन केले आहे. जर ग्राहकांनी ते आधीच खरेदी केले असेल तर सध्या ते वापरणे टाळा.

इथिलीन ऑक्साईड दीर्घकाळ वापरल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे फूड एजन्सीने म्हटले आहे. जर तुम्ही ते वापरत असाल आणि तुमच्या आरोग्याबद्दल काळजीत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

या प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार

विओनच्या अहवालानुसार, कंपनीने एक निवेदन दिले आहे की एव्हरेस्ट हा 50 वर्षे जुना नामांकित ब्रँड आहे. आमची सर्व उत्पादने चाचणीनंतरच तयार आणि निर्यात केली जातात. आम्ही स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन करतो.

आमच्या उत्पादनांना भारतीय मसाला बोर्ड आणि FSSAI सह सर्व एजन्सींच्या मंजुरीचा शिक्का आहे. प्रत्येक निर्यातीपूर्वी, आमच्या उत्पादनांची भारतीय मसाला मंडळाकडून चाचणी घेतली जाते. सध्या आम्ही अधिकृत माहितीची वाट पाहत आहोत. आमची टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT