Singhania's divorce settlement: Nawaz Modi demands 75 percent of ex-husband Gautam's net worth  Sakal
Personal Finance

भारतातील सर्वात महागडा घटस्फोट; नवाज मोदींनी रेमंडच्या मालकाकडे केली 'इतक्या' कोटींची मागणी

Gautam Singhania-Nawaz Modi: लग्नाच्या 32 वर्षानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे होत आहेत.

राहुल शेळके

Gautam Singhania-Nawaz Modi: भारतीय उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्नाच्या 32 वर्षानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे होत आहेत.

दरम्यान, एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अब्जाधीश गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने घटस्फोटाबाबत त्यांच्यासमोर मोठी अट ठेवली आहे. यामध्ये त्यांनी मालमत्तेतील 75 टक्के वाटा देण्याची मागणी केली आहे.

The Economic Timesच्या अहवालात नवाज मोदी सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया यांच्या मालमत्तेत 75 टक्के हिस्सा मागितला आहे. हा भाग मुली निहारिका, निशा आणि त्यांच्यासाठी असेल असे त्यांनी म्हटले आहे.

11,620 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक

अहवालानुसार, गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या 11,620 कोटी रुपयांच्या मालमत्तेतील 75 टक्के हिस्सा त्यांच्या मुली आणि पत्नीला देण्यास संमती दर्शवली आहे. हा निधी हस्तांतरित करण्यासाठी कौटुंबिक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाद का झाला?

रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीसोबत वादात सापडले आहेत. दिवाळीच्या दिवशी मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील रेमंड इस्टेटमध्ये गौतम सिंघानिया यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते तेव्हा ही बाब समोर आली होती, मात्र या पार्टीत त्यांच्या पत्नी नवाज सिंघानिया यांना प्रवेश मिळाला नाही.

13 नोव्हेंबर रोजी वेगळे होण्याची घोषणा

58 वर्षीय गौतम सिंघानिया यांनी 1999 मध्ये नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदी यांच्याशी लग्न केले. 13 नोव्हेंबर रोजी सिंघानिया यांनी घटस्फोटाच्या चर्चेवर एक भावनिक पोस्ट केली होती. दोघांनीही वेगवेगळ्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT