Finance  Sakal
Personal Finance

एसआयपी टॉप-अप गुंतवणूकदार आपल्या ‘एसआयपी’चा

या सुविधेनुसार गुंतवणूकदार आपल्या ‘एसआयपी’चा हप्ता (मासिक/तिमाही/सहामाही/वार्षिक) किमान ५०० रुपये किंवा ५०० रुपयांच्या पटीत ठरविक कालावधीनंतर वाढवू शकतो.

सुधाकर कुलकर्णी

दिवसेंदिवस म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ हा पर्याय लोकप्रिय होत चालला असल्याचे दिसून येते. दरमहा सुमारे १४ ते १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ‘एसआयपी’द्वारे होत असून, यात सातत्याने वाढ होत आहे.

‘एसआयपी’ हा पर्याय आणखी ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यात आता टॉप-अप सुविधा देऊ करण्यात आली आहेत. तिची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

या सुविधेनुसार गुंतवणूकदार आपल्या ‘एसआयपी’चा हप्ता (मासिक/तिमाही/सहामाही/वार्षिक) किमान ५०० रुपये किंवा ५०० रुपयांच्या पटीत ठरविक कालावधीनंतर वाढवू शकतो.

उदा, आपली १०,००० रुपयांची ‘एसआयपी’ असेल, तर ही रक्कम एका ठराविक टक्केवारीने (उदा. ५%, १०%) किंवा किमान ५०० रुपये किंवा त्या पटीत दर तिमाही किंवा सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने वाढवता येते.

थोडक्यात, आपण १,००० रुपयाने दरवर्षी आपली ‘एसआयपी’ वाढविण्याच्या पर्याय निवडला, तर पहिल्या वर्षी दरमहा १० हजार रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ११ हजार रुपये, तर तिसऱ्या वर्षी १२ हजार रुपये या पद्धतीने आपल्या ‘एसआयपी’चा मासिक हप्ता वाढत जाईल व ही प्रक्रिया आपोआप होईल.

मात्र, हा पर्याय ‘एसआयपी’ सुरू करतानाच घ्यावा लागतो. अध्येमध्येच घेता येत नाही. सर्व प्रमुख म्युच्युअल फंड ही सुविधा देऊ करत आहेत. ज्या प्रमाणात आपले उत्पन्न वाढते, त्या प्रमाणात आपली गुंतवणूक यामुळे सहजगत्या वाढविता येते.

हप्तावाढीची मर्यादा

यात जास्तीजास्त किती रकमेपर्यंत हप्ता वाढू द्यायचा ही मर्यादा ठरविता येते. उदा, आपली रु. १०,००० ची दरमहाची ‘एसआयपी’ असून, आपण निवृत्तीनंतरच्या खर्चाच्या तरतुदीच्या उद्देशाने वयाच्या ३० व्या वर्षापासून ती सुरू केली आहे.

व ती आपण पुढील ३० वर्षे चालू ठेवणार आहात. मात्र, वयाच्या ४५ व्या वर्षांनंतर आपल्याला मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामुळे यात दरमहा रु. १००० वाढ दरवर्षी करता येणे शक्य होणार नसेल.

तर आपण आपल्या ‘एसआयपी’ची कमाल मर्यादा रु. २५,००० इतकीच कायम ठेवू शकतो. यामुळे पहिली १५ वर्षे आपली ‘एसआयपी’ दरवर्षी रु. १,००० वाढेल व पुढील १५ वर्षे ती दरमहा रु.२५,००० इतकीच राहील. त्यात आणखी वाढ होणार नाही.

टॉप-अप कॅल्क्युलेटर

आजकाल बहुतेक सर्व म्युच्युअल फंडांच्या अधिकृत वेबसाइटवर ‘टॉप-अप एसआयपी’ कॅल्क्युलेटर उपलब्ध असतो. त्याचा वापर करून आपण आपल्या गरजेनुसार टॉप-अप सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

उदा, आपण इक्विटी फंडात रु. १०,००० ची ‘एसआयपी’ २० वर्षे कालावधीसाठी केली आहे व त्यात दरवर्षी रु. १,००० इतकी वाढ करण्यचा पर्याय निवडला.

तर २० वर्षांनंतर आपल्याला अंदाजे रु. १.६० कोटी एवढी रक्कम मिळेल व यासाठी आपण केवळ रु. ४,६८,००० एवढी रक्कम २० वर्षांच्या कालावधीत गुंतविलेली असेल. (१२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरून)

थोडक्यात, दीर्घकालीन गरजा व त्यात महागाईनुसार होणारी वाढ विचारात घेता टॉप-अप सुविधा वापरून भविष्यासाठी उत्तम तरतूद करणे सहजशक्य आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT