Small Savings Schemes sakal
Personal Finance

Small Savings Schemes : अल्प बचत योजनांसाठी नवे नियम , एक ऑक्टोबरपासून बदल लागू : आर्थिक व्यवहार विभागाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या काही अल्प बचत योजनांसाठीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस) या योजनांसाठी काही बदल करण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहार विभागाने या योजनांमधील अनियमितता दूर करण्याच्या उद्देशाने हे बदल केले आहेत.

अनियमित राष्ट्रीय बचत योजना (एनएसएस-८७) खाती, अल्पवयीन व्यक्तीच्या नावाखाली उघडण्यात येणारी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) खाती, एकापेक्षा अधिक ‘पीपीएफ’ खाती, अनिवासी भारतीयांची (एनआरआय) ‘पीपीएफ’ खाती आणि पालकांऐवजी आजी-आजोबांनी सुरू केलेले सुकन्या समृद्धी खाते यांच्याबाबतीत हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

‘पीपीएफ’ खात्यासाठी बदल

अनिवासी भारतीयांच्या (एनआरआय) ‘पीपीएफ’ खात्यांबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या अनिवासी भारतीयांनी पत्त्याच्या पुराव्याशिवाय खाते उघडले होते आणि ते खाते चालू असताना, ते परदेशात स्थायिक झाले असतील आणि ‘एनआरआय’ दर्जा प्राप्त झाला असेल, तर त्यांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोस्टाच्या बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणे व्याज मिळेल. या तारखेनंतर, या खात्यांवरील व्याज शून्य टक्के होईल; तसेच त्यांच्या खात्याची मुदतपूर्तीनंतर मुदतवाढ मिळणार नाही.

‘पीपीएफ’ खात्याबाबतचा दुसरा महत्त्वाचा बदल आहे तो अल्पवयीन व्यक्तींच्या नावे काढलेल्या खात्यांबाबत. अल्पवयीन व्यक्ती १८ वर्षांची होईपर्यंत त्या खात्यातील रकमेवर पोस्टाच्या बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणे व्याज चालू राहील. त्यानंतर, अल्पवयीन व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर ‘पीपीएफ’च्या दराने व्याज लागू होईल. तसेच या खात्याची मुदतही १८ व्या वर्षापासून पुढे मोजली जाईल.

त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक ‘पीपीएफ’ खाती असलेल्या खातेधारकांना एक खाते प्राथमिक खाते म्हणून निवडावे लागेल आणि त्या प्राथमिक खात्यातील रक्कम वार्षिक मर्यादेत असेल, तरच ‘पीपीएफ’ योजनेचा व्याजदर मिळेल. दुसऱ्या खात्यातील शिल्लक प्राथमिक खात्यात विलीन केली जाईल आणि त्यातील वार्षिक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम शून्य टक्के व्याजाने परत केली जाईल.

राष्ट्रीय बचत योजनेसाठी बदल

राष्ट्रीय बचत योजना-८७ (एनएसएस) अंतर्गत दोनपेक्षा अधिक खात्यांबाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत दोन एप्रिल १९९० पूर्वी दोन खाती उघडलेल्या आणि या तारखेनंतरच्या दोन खात्यांसाठी बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दोन एप्रिल १९९० पूर्वी उघडलेल्या एकापेक्षा अधिक खात्यांच्या बाबतीत करण्यात आलेल्या बदलानुसार, पहिल्या खात्यावर प्रचलित योजनेच्या दराने व्याज मिळत राहील.

पहिल्या खात्यानंतर उघडण्यात आलेल्या दुसऱ्या खात्यातील रकमेवर बचत खात्याचा व्याजदर अधिक दोन टक्के दराने व्याज मिळेल. मात्र, यासाठी दोन्ही खात्यातील एकूण ठेवी वार्षिक मर्यादेपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. तसे असल्यास अतिरिक्त रक्कम विनाव्याज खातेदारांना परत केली जाईल आणि एक ऑक्टोबर २०२४ पासून दोन्ही खात्यांवर शून्य टक्के व्याज मिळेल.

दोन एप्रिल १९९० नंतर उघडलेल्या दोन खात्यांसाठी, पहिल्या खात्याला योजनेचा व्याजदर मिळेल, तर दुसऱ्या खात्यावर बचत खात्याच्या व्याजदराने व्याज मिळेल, तर दोनपेक्षा जास्त खाती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी प्राथमिक खाते वगळता अन्य खात्यांवर व्याज मिळणार नाही आणि फक्त मूळ रक्कम परत केली जाईल.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी बदल

सुकन्या समृद्धी योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलानुसार, आजी-आजोबांनी उघडलेली खाती आता कायदेशीर पालकांकडे किंवा नैसर्गिक पालकांकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shinde vs Bjp: शिंदे गटाने दिला भाजपलाच धक्का; बड्या नेत्याला बनवले शिवसैनिक

IND vs BAN, 2nd Test: मैदान खेळण्यास तयार नाही! तिसऱ्या दिवसाचा खेळही झाला रद्द; BCCI ने दिले अपडेट्स

Flipkart Big Billion Days Sale : लॅपटॉप घेण्याचा फक्त विचार करू नका, लगेचच घेऊन टाका! फ्लिपकार्ट सेलमध्ये लॅपटॉपवर आहे बंपर सूट

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन राजभवनात दाखल

World Heart Care 2024: पूर्ण झोप अन् ध्यानाने टाळा हृदयविकार, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

SCROLL FOR NEXT