online farud  sakal
Personal Finance

Smart Information :ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे दीड लाखाचा फटका

अलीकडेच एका महिलेने डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी म्हणून एका नावाजलेल्या हॉस्पिटलच्या

सकाळ वृत्तसेवा

शिरीष देशपांडे

आजकाल ऑनलाइन सुविधेमुळे घरबसल्या अनेक कामे होतात. अगदी डॉक्टरांची अपॉइंटमेंटदेखील ऑनलाइन घेता येते. यासाठी अनेक ॲप, वेबसाइट उपलब्ध आहेत. मात्र, या सुविधांचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा सुविधांचा वापर करताना सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

अलीकडेच एका महिलेने डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी म्हणून एका नावाजलेल्या हॉस्पिटलच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केला. त्या हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी, असे सांगितले. त्यावेळी पलीकडील व्यक्तीने अपॉइंटमेंटसाठी एक लिंक पाठवतो, ती लगेच भरून द्या, असे सांगितले. त्यानुसार, त्या महिलेने आपली संपूर्ण माहिती त्या लिंकद्वारे भरून पाठवली. त्यानंतर काही क्षणांतच त्या महिलेच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये वजा झाल्याचा संदेश आला.

हे कसे झाले?

या महिलेने हॉस्पिटलचा नंबर ऑनलाइन शोधला होता. तो नंबर खोटा होता. चोरट्यांनी हॉस्पिटलच्या नावाखाली बनावट नंबर टाकला होता. डॉक्टरची अपॉइंटमेंट हा महत्त्वाचा धागा पकडून चोरट्याने सौजन्यपूर्ण शब्दात, हवी ती अपॉइंटमेंट देतोय, असे भासवून महिलेला सर्व तपशील भरण्यासाठी एक बनावट लिंक पाठविली. अशा लिंकद्वारे, आपल्या मोबाईलमधील इतर माहिती चोरतात, याची कल्पना त्या महिलेला नव्हती. त्यामुळे ती अगदी सहजपणे चोरट्यांच्या जाळ्यात अडकली आणि चोरट्याने लिंकद्वारे बँक खात्याचा तपशील चोरून दीड लाख रुपये पळविले.

काय काळजी घ्यावी?

इंटरनेटवर शोधलेल्या कोणत्याही वैद्यकीय सेवांची खात्री पटल्याशिवाय त्यांच्याशी संपर्क करणे टाळावे.

डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी ऑनलाइन नंबर शोधताना खबरदारी घ्या. हॉस्पिटलच्या अधिकृत वेबसाइटवरूनच नंबर घ्या.

फॉर्म भरला का, पैसे ट्रान्सफर केले का, असा तगादा लावला जात असेल, तर नक्की काहीतरी गडबड आहे, हे लक्षात घ्या.

नव्या डॉक्टरांची माहिती त्यांच्या दवाखान्यात जाऊन घ्यावी किंवा आपल्या परिचितांपैकी कोणी त्या डॉक्टरांना ओळखतात का, याची चौकशी करावी आणि मगच अपॉइंटमेंट घ्यावी.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली माहिती तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.

अधिकृत हॉस्पिटल कधीही अपॉइंटमेंटसाठी पैसे भरावयास सांगत नाहीत, हे लक्षात असू द्या.

कोणतीही लिंक धोकादायक

असू शकेल, अशीच मनाची धारणा ठेवा.

फसवणूक झाल्यास ...

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. त्यामुळे इतर लोकही सावध होतील.

त्वरित १९३० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल.

(लेखक सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT