Sovereign Gold Bonds Scheme: तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारने सुरू केलेला ही विशेष योजना आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2015 मध्ये सरकारी सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजना प्रथम सुरू करण्यात आली.
सरकारच्या या योजनेंतर्गत बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. त्यात केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी सरकार देते. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) योजनेअंतर्गत स्वस्त सोने खरेदी करता येते. RBI ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सार्वभौम सुवर्ण रोखेची (SGB) दुसरी सिरिज सुरु केली आहे.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदीसाठी पाच दिवसांचा कालावधी आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सोने खरेदी करता येते. सार्वभौम सुवर्ण रोखेमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.
सार्वभौम सुवर्ण रोख्यांची किंमत किती?
8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन 99.9 टक्के शुद्ध सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल. यामुळे किंमत कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल.
किती व्याज मिळेल?
या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास, लोकांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिले जाईल. सार्वभौम सुवर्ण रोखेचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे. पाच वर्षांनंतर, ग्राहकांना ही योजना रद्द करण्याचा पर्याय असेल.
सार्वभौम सुवर्ण रोखे अंतर्गत सोने कोठे खरेदी करावे?
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे स्वस्त सोने खरेदी केले जाऊ शकते. तुम्ही त्यात डीमॅट खात्याअंतर्गत गुंतवणूक करू शकता.
किती गुंतवणूक करता येईल?
या योजनेअंतर्गत, भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था गुंतवणूक करू शकतात. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करण्याची परवानगी आहे. तर ट्रस्ट आणि संस्था यांना एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.