state bank net profit of Rs 20698 crore dividend of Rs 13 70 per share was declared to shareholders Sakal
Personal Finance

SBI : स्टेट बँकेला २०,६९८ कोटींचा निव्वळ नफा; भागधारकांना प्रतिशेअर १३.७० रुपयांचा लाभांश जाहीर

एकूण आणि निव्वळ एनपीएमधील गुणोत्तराबाबतीतही ३६ तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : भारतीय स्टेट बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २४ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, २०,६९८ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत बँकेने १६,६९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. बँकेने प्रतिशेअर १३.७० रुपयांचा लाभांश घोषित केला आहे.

मार्च तिमाहीत बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असून, एकूण एनपीए गेल्या वर्षीच्या २.७८ टक्क्यांच्या तुलनेत २.२४ टक्क्यांवर आला आहे, तर निव्वळ ‘एनपीए’ गेल्या वर्षीच्या ०.६७ टक्क्यांच्या तुलनेत ०.५७ टक्क्यांवर आला आहे. मार्च तिमाहीत बँकेच्या कर्जव्यवसायाने आठ तिमाहीतील सर्वोत्तम वाढ नोंदवली असून,

एकूण आणि निव्वळ एनपीएमधील गुणोत्तराबाबतीतही ३६ तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे. बँकेच्या व्याजउत्पन्नातही वार्षिक १९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते ९२,९५१ कोटी रुपये होते.

कर्जाची वाढ वार्षिक १५.२४ टक्के असून, देशांतर्गत वाढ १६.२६ टक्के आहे. व्यावसायिक आणि कृषी कर्जे अनुक्रमे ११ लाख कोटी आणि तीन लाख कोटी रुपयांहून अधिक आहेत, असे बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मार्च २०२४ तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्नही वाढले असून, वर्षभरापूर्वीच्या याच काळातील १.०६ लाख कोटी रुपयांवरून ते १.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर ऑपरेटिंग खर्च तुलनेने कमी झाला असून, ३०, २७६ कोटींवर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सोलापुरात भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना वकील सापडला; 80 हजार रुपयांची पाकिटे सापडली, पोलिसांत गुन्हा दाखल

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Woolen Clothes Skin Allergy: हिवाळ्यात स्वेटर घातल्यानंतर त्वचेला अ‍ॅलर्जी होते? हे टाळण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

SCROLL FOR NEXT