Personal Finance

Ratan Tata: रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार! राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द

Sandip Kapde

मुंबई, दि. १० ऑक्टोबर: ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने आज (गुरुवार, १० ऑक्टोबर) राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुखवट्याची माहिती दिली आहे. या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तसेच, मनोरंजनाचे आणि करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, रतन टाटा यांच्या सन्मानार्थ हा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी देखील घोषणा त्यांनी केली आहे.

मुंबईतील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द-

मुंबईत आज राज्य शासनाचे अनेक कार्यक्रम नियोजित होते, मात्र रतन टाटा यांच्या निधनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम आता पुढील दिवशी घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

रतन टाटा यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाणार असून, उद्या त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतात एक दुर्मिळ रत्न हरपले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे.

रतन टाटा: नैतिकतेचे आणि उद्यमशीलतेचे प्रतीक

रतन टाटा हे नैतिकता आणि उद्यमशीलतेचा आदर्श संगम होते. टाटा ग्रुपची जवळपास १५० वर्षांची परंपरा त्यांनी यशस्वीरित्या पुढे नेली. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा केमिकल्स आणि टाटा स्टील यांसारख्या मोठ्या कंपन्यांना त्यांनी नवी उंची गाठून दिली.

१९९१ मध्ये रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने जागतिक स्तरावर विस्तार केला. २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी उद्योगांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आठवण मुंबईवरील २००८ च्या हल्ल्यांनंतर त्यांच्या दृढतेतून दिसून आली.

रतन टाटा यांचा विचार, धाडसी निर्णय, आणि कर्तृत्व यामुळे ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : ही दोस्ती..! रतन टाटांसाठी भावुक झाला शंतनू; पोस्ट लिहीत म्हणाला, "दु:ख ही प्रेमासाठी..."

Ashtami October 2024: नवरात्रीत अष्टमी -नवमी कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तारीख, वेळ अन् महत्व

Latest Maharashtra News Updates : संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

'देशाला म्लेंच्छ बाधा झालीये, गांधीवादी विचार आत्मसात केल्याने देश नरक झालाय'; काय म्हणाले संभाजी भिडे?

IND vs BAN 2nd T20I: हम 'सात'!भारतीय संघाने ट्वेंटी-२०त नोंदवला भारी रेकॉर्ड; पाकिस्तानच्या नाकावर मारली टिचकी

SCROLL FOR NEXT