RNR Biryani Sakal
Personal Finance

Narishakti Success Story: आजीच्या हातची चव पोहचली जगभरात; दोन बहिणींनी 5 लाखात सुरु केला व्यवसाय, आज आहे 10 कोटींचा ब्रँड

राहुल शेळके

Success Story: बेंगळुरूमध्ये, रम्या आणि श्वेता रवी या दोन बहिणींनी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ RNR डोने बिर्याणी नावाचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे. आजीची खास रेसिपी डोना बिर्याणी संपूर्ण शहरात प्रसिद्ध व्हावी हा त्यांचा उद्देश होता. 2020 मध्ये सुरू झालेल्या या प्रवासात त्यांनी आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केली आहे.

कोणती बिर्याणी सर्वोत्तम यावर नेहमीच वाद होत आला आहे. काही लोकांना हैद्राबादी बिर्याणीच्या चवीचं वेड असतं तर काही लोक कोलकाता बिर्याणीला सर्वोत्तम मानतात. पण, बेंगळुरूच्या रम्या रवी आणि तिची बहीण श्वेता यांच्यासाठी डोने बिर्याणी हीच सर्वोत्तम आहे.

ही बिर्याणी त्यांची आजी बनवत असे. म्हणून, त्यांनी 2020 मध्ये RNR Donne Biryani नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास अजिबात संकोच केला नाही. पहिल्याच महिन्यात 10,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्याने या व्यवसायाचा पाया मजबूत झाला. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

5 लाख रुपयांपासून सुरुवात

रम्या आणि तिची बहीण श्वेता दोघी व्यवसाय सांभाळतात. 5 लाख रुपयांच्या भांडवलात 200 स्क्वेअर फुटांचे क्लाउड किचन त्यांनी सुरू केले. आज ब्रँडचा विस्तार बेंगळुरूमध्ये 14 क्लाउड किचन आणि एक स्टँड-अलोन रेस्टॉरंटमध्ये झाला आहे.

डोना बिर्याणी इतर बिर्याणीपेक्षा वेगळी आहे कारण बिर्याणीचा रंग हा हिरवा आहे. बिर्याणीत वापरण्यात येणारा भातही वेगळा आहे. यामध्ये लहान धान्याचा तांदूळ वापरला जातो. त्याला जिरगा सांबा भात म्हणतात.

डोनाय बिर्याणी बेंगळुरूमध्ये उपलब्ध आहे. पण, इतर बिर्याणींइतकी ती लोकप्रिय का नाही, असा प्रश्न बहिणींना पडला. त्यामुळे प्रत्येक घरात डोना बिर्याणी पोहोचवण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना

जरी ही रेसिपी रम्या आणि श्वेताच्या आजीची असली तरी, RNR बिर्याणीचे नाव त्यांचे आजोबा आणि वडील रामास्वामी आणि रविचंदर यांच्या नावावर आहे. दोन्ही बहिणींना नेहमी वेगळे काहीतरी करायचे होते. पण, लॉकडाऊन दरम्यान त्यांना मिळालेल्या वेळेमुळे त्यांना यावर काम करता आले. लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या कल्पनेवर विचारमंथन करण्यासाठी बराच वेळ मिळाला.

आरएनआर डोने बिर्याणीसोबत ड्रमस्टिक चिली स्टार्टर आणि चिकन घी रोस्ट देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. व्हेज बिर्याणीसाठी तुम्हाला 300 रुपये खर्च करावा लागेल आणि नॉनव्हेज बिर्याणीसाठी तुम्हाला 400 रुपये खर्च करावा लागेल. स्थापनेपासून आतापर्यंत 10 कोटी रुपयांचा महसूल डोने बिर्याणीने कमावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT