Diamond  Sakal
Personal Finance

Diamond Industry: गुजरातमधील हिरे उद्योगात मंदी! कर्मचारी उचलताहेत टोकाचं पाऊल; 65 जणांनी संपवलं जीवन

राहुल शेळके

Gujarat Diamond Industry: डायमंड वर्कर्स युनियन गुजरातने 15 जुलै रोजी सुरू केलेल्या 'सुसाइड हेल्पलाइन नंबर'वर 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कॉल केला आहे. या उपक्रमाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.

डायमंड वर्कर्स युनियन गुजरातचे उपाध्यक्ष भावेश टंक यांनी सांगितले की, सुरतमध्ये गेल्या 16 महिन्यांत 65 हिरे कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी बहुतेकांना पगार कपात आणि आर्थिक मंदीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

सुरत हे या प्रदेशातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे, जिथे जगातील सुमारे 90 टक्के हिरे कापले जातात आणि पॉलिश केले जातात. सुरत येथील केंद्रात 10 लाख कर्मचारी काम करतात. ते म्हणाले, आम्ही हा हेल्पलाइन क्रमांक 15 जुलै रोजी सुरू केला.

आतापर्यंत आम्हाला 1,600 हून अधिक कॉल्स आले आहेत, त्यापैकी अनेकांनी आर्थिक ताणामुळे आत्महत्या करण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांत बहुतेक कॉल करणारे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांनाही रोजगार मिळण्याची चिंता आहे.

भावेश टंक म्हणाले, “ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे ते लोक त्यांच्या मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, घराचे मासिक हप्ते आणि वाहन कर्ज इत्यादी भरण्यासाठी मदत मागत आहेत. युक्रेन-रशिया आणि इस्रायल-गाझा संघर्ष, तसेच प्रमुख बाजारपेठेतील चीनमधील कमकुवत मागणीमुळे अतिरिक्त पुरवठा झाला आहे, ज्यामुळे यावर्षी 50,000 कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत."

रविवारी एका कार्यक्रमात, धर्मनंदन डायमंड्सचे अध्यक्ष लालजी पटेल यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 15,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि प्रदेशातील गरजू कुटुंबांना धनादेश वितरित केले.

"छोटे डायमंड युनिट्स बंद झाल्यामुळे, काही ज्वेलर्सना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत आणि ते त्यांच्या मुलांची शाळा आणि महाविद्यालयाची फी भरू शकत नाहीत," धर्मनंदन डायमंड्सने एका निवेदनात म्हटले आहे.

"आर्थिक मदत मागणाऱ्या कुटुंबांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केल्यानंतर, त्यांना शाळेच्या फीचे धनादेश देण्यात आले," असे निवेदनात म्हटले आहे. रविवारी एका धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांचे धनादेश देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT