Tata Consumer acquires Capital Foods, Organic India Rs 7,000 crore deals  Sakal
Personal Finance

Tata Group: टाटा समूहाने विकत घेतल्या आणखी दोन कंपन्या; 'इतक्या' कोटींची झाली डील

Tata Group: टाटा समूहाच्या टाटा कंझ्युमरने कॅपिटल फूड खरेदी करण्यासाठी करार केला आहे. करार पूर्ण झाल्यावर कॅपिटल फूडची मालकी टाटा कंपनीकडे जाईल. कॅपिटल फूडच्या प्रसिद्ध ब्रँडमध्ये चिंग्स सीक्रेट भारतातील एकमेव स्वदेशी चायनीज फूड ब्रँड आणि स्मिथ अँड जोन्स यांचा समावेश आहे.

राहुल शेळके

Tata Group: टाटा समूहाच्या टाटा कंझ्युमरने कॅपिटल फूड खरेदी करण्यासाठी करार केला आहे. करार पूर्ण झाल्यावर कॅपिटल फूडची मालकी टाटा कंपनीकडे जाईल. कॅपिटल फूडच्या प्रसिद्ध ब्रँडमध्ये चिंग्स सीक्रेट भारतातील एकमेव स्वदेशी चायनीज फूड ब्रँड आणि स्मिथ अँड जोन्स यांचा समावेश आहे.

या सोबतच टाटा समूह फॅब इंडिया कंपनी देखील खरेदी करणार आहे. यासाठी कंपनीने दोन्ही कंपन्यांशी करार केला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही कंपन्या टाटा समूहाचा भाग बनतील.

टाटा समूह या दोन्ही कंपन्यांना 7000 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. हा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो, असे टाटा कंझ्युमरने म्हटले आहे. कॅपिटल फूडचे संस्थापक अजय गुप्ता म्हणाले की, आम्ही टाटा समूहा सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

तर फॅबिंडियाचे एमडी विल्यम बिसेल म्हणाले की टाटा समूह सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळापासून आहे. आम्हीही त्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहोत. शुक्रवारी, टाटा कंझ्युमर शेअर्स 3.5% वाढून 1,158.7 रुपयांवर व्यवहार करत होते.

100 टक्के हिस्सा खरेदी करणार

टाटा कंझ्युमर कॅपिटल फूड्सचे 100% इक्विटी शेअर्स कंपनीकडून खरेदी केले जातील. कराराच्या अटींनुसार, Tata Consumer Products कॅपिटल फूडच्या इक्विटी शेअरहोल्डिंगपैकी 75% संपादन करेल. उर्वरित 25 टक्के पुढील 3 वर्षांत खरेदी करणार आहे. या अधिग्रहणामुळे टाटा कंझ्युमरचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्यास मदत होईल.

बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी कॅपिटल फूडचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे टाटा कंपनीने सांगितले. Tata Consumer ने सांगितले की FY2024 साठी कॅपिटल फूडची अंदाजे उलाढाल सुमारे 750 ते 770 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT