Tata Consumer: टाटा ग्रुपची एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स मिठाई रिटेल कंपनी हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करू शकते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा कंझ्युमरची हल्दीराममधील स्टेक खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. बातमीनुसार, टाटा कंझ्युमर हल्दीराममधील 51 टक्के स्टेक खरेदी करू शकते.
हल्दीरामने हा स्टेक विकण्यासाठी 10 बिलियन डॉलर्सचे मूल्यांकन मागितले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा कंझ्युमर 2.37 टक्क्यांच्या वाढीसह 866 रुपयांवर व्यवहार करत आहे.
हल्दीराम ब्रँड हा कौटुंबिक व्यवसाय आहे. जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. पण जसजसा कंपनीचा विस्तार होऊ लागला तसतशी हल्दीराम प्रादेशिक आणि ट्रेडमार्क हक्कांवरून नवीन पिढीमध्ये तणाव वाढू लागला.
सध्या मूलचंद, रामेश्वर लाल आणि सतीदास आणि त्यांची मुले वेगवेगळ्या नावाने भारतीय नमकीन बाजार सांभाळत आहेत. या नावांमध्ये हल्दीराम अँड सन्स, बिकाजी, हल्दीराम नागपुरे, हल्दीराम भुजियावाला यांचा समावेश आहे.
हे बंधू भारतातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड 'हल्दीराम' चालवतात आणि आता दिल्ली आणि नागपूरमधील त्यांचे ऑपरेशन विलीन करून देशातील सर्वात मोठी एथनिक स्नॅक्स कंपनी तयार करण्याची तयारी करत आहेत.
नागपूरस्थित हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल हा मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल चालवतात, तर दिल्लीस्थित हल्दीराम स्नॅक्स हे धाकटे भाऊ मनोहर आणि मधुसूदन अग्रवाल चालवतात.
सूत्रांनी सांगितले की, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील स्टेक खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तीने सांगितले की टाटा हल्दीराममधील 51 टक्क्यांहून अधिक भागभांडवल खरेदी करू इच्छित आहे परंतु त्यांनी स्नॅक्स कंपनीला सांगितले की त्यांची मागणी खूप आहे.
टाटा कंझ्युमर ही चहा कंपनी म्हणून ओळखली जाते तर हल्दीरामचे नाव ग्राहक क्षेत्रात खूप मोठे आहे आणि भागभांडवल खूप जास्त आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी बाजारात सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.