tata group air india got 12 cr dollar loan from japan bank smbc sakal
Personal Finance

Air India : एअर इंडियाला जपानी बँकेकडून १२ कोटी डॉलरचे कर्ज प्राप्त

‘एसएमबीसी’च्या सिंगापूर शाखेद्वारे हा कर्जपुरवठा करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टाटा समूहाच्या ‘एअर इंडिया’ कंपनीने एअरबसकडून विमान खरेदीकरिता जपानमधील आघाडीची बँक ‘एसएमबीसी’कडून १२ कोटी डॉलरचे कर्ज घेतले आहे. या व्यवहारामुळे एअर इंडियाने एअरबसकडून खरेदी केलेल्या ‘ए-३५०-९००’ विमानाच्या व्यवहारातील अंशतः रक्कम या कर्जाद्वारे देण्यात आली असल्याचे ‘एसएमबीसी’ने म्हटले आहे.

एअर इंडियाला एअरबसकडून ऑक्टोबर २०२३ मध्ये हे विमान वितरित करण्यात आले आहे. ‘एसएमबीसी’च्या सिंगापूर शाखेद्वारे हा कर्जपुरवठा करण्यात आला आहे, तर एअर इंडियाची गिफ्ट सिटीत मुख्यालय असलेली ‘एआय फ्लीट सर्व्हिसेस’ ही शाखा कर्जदार आहे.

टाटा समूहाने बोईंग आणि एअरबसकडून एकूण ४७० विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती, त्या व्यवहाराचा हा भाग आहे. एअरबसच्या ‘ए-३५०’ विमानाची किंमत ३० कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे.

या कर्जपुरवठा कराराद्वारे ‘एसएमबीसी’ समूहाची टाटा समूहासोबत भागीदारी अधिक दृढ झाली आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, असे ‘एसएमबीसी’चे भारतातील प्रमुख हिरोयुकी मेसाकी यांनी सांगितले. बँकेने पहिल्यांदाच विमानखरेदीसाठी कर्ज दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत ही जगातील पाचवी सर्वांत मोठी विमान वाहतूक बाजारपेठ असून, विमानप्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीयांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे, त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे ‘एसएमबीसी’ने म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने जाहीर केलेल्या सर्वांत मोठ्या विमान खरेदीच्या ऑर्डरमधील पहिले विमान कंपनीला मिळाले आहे, असे एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी निपुण अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT