Tata Group Beats Pakistan Economy Sakal
Personal Finance

Tata Group: एक कंपनी अख्ख्या पाकिस्तानपेक्षा भारी! टाटांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे

Tata Group Beats Pakistan Economy: टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. टाटा समूहाचे मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर किंवा 30.30 लाख कोटी रुपये आहे. IMF च्या अहवालानुसार, पाकिस्तानचा GDP 341 अब्ज डॉलर आहे.

राहुल शेळके

Tata Group Beats Pakistan Economy: टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. टाटा समूहाचे मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर किंवा 30.30 लाख कोटी रुपये आहे. IMF च्या अहवालानुसार, पाकिस्तानचा GDP 341 अब्ज डॉलर आहे. म्हणजे एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे.

भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आकार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास निम्मा आहे. TCS चे मार्केट कॅप 170 अब्ज डॉलर आहे.

गेल्या वर्षभरात टायटन, टीसीएस आणि टाटा पॉवरमध्ये झालेल्या वाढीमुळे टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात टाटा कंपन्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे.

टाटा समूहातील कंपन्यांमध्ये TRF, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्टसन इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. याशिवाय टाटा कॅपिटल, जो पुढील वर्षी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे, त्याचा आकार 2.7 लाख कोटी रुपये आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था संकटात

पाकिस्तानचा GDP आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 6.1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 5.8 टक्के होता. या व्यतिरिक्त देशावर 125 अब्ज डॉलर्सची विदेशी कर्ज आहे आणि पाकिस्तान जुलैपासून 25 अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज देण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत 11 पटीने लहान आहे. सध्या देशाचा जीडीपी सुमारे 3.7 अब्ज डॉलर आहे. जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत आर्थिक वर्ष 2028 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास आहे. सध्या भारत ही जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT