मुंबई : प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वितरकांना आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा मोटर्सच्या उपकंपन्या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (टीएमपीव्ही) आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) यांनी बजाज फिनसर्व्हचा भाग असलेल्या बजाज फायनान्स कंपनीबरोबर एक सामंजस्य करार केला आहे.
या करारामुळे ‘टीएमपीव्ही’ अणि ‘टीपीईएम’च्या वितरकांना बजाज फायनान्सद्वारे सहज आर्थिक साह्य उपलब्ध होणार आहे. ‘टीपीईएम’चे प्रमुख आर्थिक अधिकारी व ‘टीएमपीव्ही’चे संचालक धिमन गुप्ता आणि बजाज फायनान्सचे, प्रमुख व्यवसायिक अधिकारी सिद्धार्थ भट यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी धिमन गुप्ता म्हणाले, ‘‘आमच्या व्यवसायामध्ये आमचे वितरक महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये सहजता यावी याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही बजाज फायनान्सशी भागीदारी करून आर्थिक उपयायोजना आणली आहे. यामुळे वितरकांशी आमचे नाते अधिक मजबूत होईल आणि त्यांना कामाकरिता अधिक आर्थिक मदत मिळेल.’’
बजाज फायनान्सचे उप-महासंचालक अनुप साहा म्हणाले, ‘‘या आर्थिक उपक्रमाच्या माध्यमातून, आम्ही ‘टीएमपीव्ही’ आणि ‘टीपीईएम’चा अधिकृत प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन वितरकांना आर्थिक मदत करणार आहोत, ज्यामुळे त्यांना प्रवासी वाहन बाजारामध्ये व्यवसाय वाढविण्याची संधी मिळेल. याचा फायदा फक्त वितरकांनाच होणार नाही, तर एकूणच देशातील वाहन उद्योगाला मदत मिळणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.